डोळ्यात मिरची पावडर टाकून व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद -दौंड पोलिसांची कारवाई
By : Polticalface Team ,Thu May 26 2022 19:44:40 GMT+0530 (India Standard Time)
दौंड तालुका प्रतिनिधी- राजेंद्र सोनवलकर :29/04/2022 रोजी सायंकाळी 7 वाजता चे सुमारास कांतीलाल पारसीया व त्यांचा मुलगा हे काष्टी येथील दुकान बंद करून दौंड कडे जात असताना सोनवडी गावचे हद्दीत धनश्री बिअर बारचे समोर काही अज्ञात इसमानी त्यांची दुचाकी अडवून त्यांचे डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांचे ताब्यातील 2,50,600 रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता. सदर घटने बाबत दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा पासून सदर गुन्ह्याचा तपास हे दौंड पोलीस करीत होते. तपास करीत असताना दौंड पोलिसांचे हाती काही पुरावे मिळून आलेने सदर पुराव्यांचे आधारे तपास केला असता गोपनीय बातमीदारमार्फत मिळाले माहिती नुसार सदरचा गुन्हा हा 1)ओमकार वाघमोरे वय 19 वर्षे 2)सिद्धार्थ आकोटे ,वय 21 वर्षे 3) समद तांबोळी,वय 24 वर्षे 4)सागर धेंडे वय 23 वर्षे सर्व रा. काष्टी, ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांनी त्यांचे इतर साथीदार यांचे सोबत मिळून केला असल्याचे निष्पन्न झालेने त्या तिघांना गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचे कडून इतर आरोपिं बाबत व गुन्ह्यात चोरी केले मुद्देमाल बाबत माहिती काढण्याचे काम चालू आहे. या आरोपींना दौंड न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे
सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उ.वि.पो.अ. राहुल धस यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे,पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी,पो.उप.नि महेश आबनावे,पो.हवा सुभाष राऊत, पो.ना अमोल गवळी,पो.ना निखिल जाधव, पो .ना आदेश राऊत,पो.कॉ अमोल देवकाते, पो.कॉ अभिजित गिरमे,पो कॉ रवी काळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेश आबनावे हे करीत आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी