बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून माजी उपसरपंच काकासाहेब शिर्के यांना काठीने जबरदस्त मारहाण
By : Polticalface Team ,Fri May 27 2022 09:41:27 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा वार्ताहर :-
बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून निंबवी गावचे माजी उपसरपंच काकासाहेब शिर्के यांना काठीने जबरदस्त मारहाण झाली आहे. काकासाहेब शिर्के हे ढवळगाव येथील कारखाना चौकामध्ये पाहुण्यांना नेण्यासाठी आले असता, तिथे रस्त्याच्या कडेला त्यांची चार चाकी गाडी उभी करून उभे होते. तू इथे का ऊभा थांबला आहे, अशी विचारणा करून त्यांना मारहाण केली आहे.
ही घटना गुरुवार दिनांक 26 मे रोजी संध्याकाळी 9 ते 10 च्या दरम्याण झाली आहे.
काहीही कारण नसताना पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी मारहाण केली आहे आसे म्हणने निंबवी गावचे मा.उपसरपंच काकासाहेब शिर्के यांचे आहे.
निंबवी गावचे दोनशे ते तीनशे ग्रामस्थ ढवळगाव कारखाना च्या चौकात थांबले होते बेलवंडी पोलिस स्टेशन पुढे आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. संध्याकाळचा खूप उशीर झाल्यामुळे उद्योजक मा.पंचायत समिती सदस्य अतुलशेठ लोखंडे यांनी निंबवी ग्रामस्थांची समजूत काढून. याविषयीचा जाब विचारण्यासाठी आपण उद्या जाऊ अशी ग्रामस्थांना सांगितले त्यामुळे सर्व ग्रामस्थ घरी माघारी फिरले. परंतु दिनांक 27 मे रोजी निंबवी ग्रामस्थ,तरुण,महिला मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन च्या समोर पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समजत आहे.
काकासाहेब शिर्के हे निंबवी गावचे माजी उपसरपंच असून सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली असता त्यांनी सांगितले आहे की निंबवीला येण्यासाठी संध्याकाळची कोणतेही वाहणे उपलब्ध नसतात. ढवळगाव मध्ये नातेवाईक येणार असून त्यांना नेण्यासाठी मी व माझे मित्र आलो असता चौकामध्ये रस्त्याच्या कडेला चार चाकी गाडी लावली होती व आम्ही रस्त्याच्या कडेला उभे होतो, व त्या ठिकाणी नंदकुमार दुधाळ साहेब आले व आम्हांला इथे का उभे राहिले म्हणून उद्धट भाषेमध्ये खवळू लागले, नातेवाईक येणार आहेत ते आले की आम्ही लगेच जाणार आहे अशे त्यांना बोललो असता त्यांनी लगेच काठीने अमानुषपणे हानमार करण्यास सुरुवात केली, व मला उलटे बोलतो अशे म्हणत काठीने मारहाण केली,अशी प्रतिक्रिया काकासाहेब शिर्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
*या हानमारी मुळे ढवळगाव पंचक्रोशीतील गावामधील नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण*
ढवळगाव हे निंबवी,कोंडेगव्हाण,आरणगाव,माठ,राजापुर,येवती, या गावांना व वाड्या वस्त्यांना जोडणारे गाव आहे,व या गावांना जाण्यासाठी संध्याकाळची कोणतीही वाहने उपलब्ध नसतात व घरी जाण्यासाठी कुणी ना कुणी नातेवाईक ढवळगाव चौकामध्ये थांबत असतात पंरतु कसल्याही प्रकारची खात्री न करता माजी उपसरपंच काकासाहेब शिर्के यांना हानमार झाल्यामुळे या अनेक गावातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
*बेलवंडी पोलीस स्टेशन चोर सोडून संन्याशाला फाशी देते काय ?*
अनेक दिवसांपासून बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरी,दरोडे,अवैध धंदे, यांचा चांगलाच पेव सुटला असुन त्यावर पोलिसांचा कसलाच वचक राहिला नाही. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका रात्रीत अनेक चोऱ्या होतात, दिवसाढवळ्या रस्त्यावर लुटीचे प्रकार होत आहे,आरोपी पोलिसांना सापडतही नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांकडून बेलवंडी पोलीस स्टेशन विषयी चोर सोडून संन्याशाला फाशी देते काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून, बेलवंडी येथील पोलिसांविषयी नागरिकांमध्ये एक वेगळीच प्रतिमा तयार होत आहे ?
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी