महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागामार्फत मुलींच्या वसतिगृहास मान्यता

By : Polticalface Team ,Fri May 27 2022 09:43:38 GMT+0530 (India Standard Time)

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागामार्फत मुलींच्या वसतिगृहास मान्यता पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलींचे शासकीय वसतिगृहास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. उसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ( मुले व मुली ) शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या शैक्षणिक वर्षापासून महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संत भगवानबाबा ऊसतोड कामगार मुलांचे शासकीय वसतीगृह सुरु करण्यात येत आहे. येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालय परिसरात मुलींसाठी वसतीगृह सुरु करण्यास परवानगी मिळाली असून या वसतीगृहात ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपस्थितीनुसार प्रत्येक मुलीला ५०० रु. निर्वाह भत्ता प्रत्येक महिन्याला दिला जाणार आहे. तसेच गणवेश, शैक्षणिक सहल या साठीही आर्थिक मदत प्रत्येक मुलीला दिली जाणार आहे. विद्यार्थीनीसाठी मोफत शैक्षणिक सुविधेबरोबरच संगणक, इंटरनेट व वाचनालयाची सुविधा दिली जाणार आहे. १०० मुलींच्या क्षमतेचे हे वसतीगृह असून सदरच्या वसतीगृहात केवळ ऊसतोड कामगारांच्या मुलींनाच प्रवेश द्यावयाचा असल्याने ऊसतोड कामगार असल्याबाबतचा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तरी गरजू ऊसतोड कामगारांच्या मुलीनी शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेऊन आपले उच्चशिक्षणाचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड,उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष