पाच जणांनी केलेल्या मारहाणीत गंभीर दुःखापत होऊन एकाचा मृत्यू.

By : Polticalface Team ,Fri May 27 2022 14:59:34 GMT+0530 (India Standard Time)

पाच जणांनी केलेल्या मारहाणीत गंभीर दुःखापत होऊन एकाचा मृत्यू. श्रीगोंदा: शहरातील रहिवासी असलेल्या पाच जणांनी सचिन विठ्ठल जाधव वय वर्ष 35 राहणार शिक्षक कॉलनी श्रीगोंदा या इसमास कैकाडी गल्ली येथे दारू पिऊन येण्यास मज्जाव करत मारहाण केली आहे. त्या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने नमूद इसमाचा दिनांक 26 मे 2022 रोजी 4:00 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेला सचिन विठ्ठल जाधव यास दिनांक 22 मे 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास महंमद महाराज पटांगणातील मज्जिद जवळ उभा असताना अक्षय गायकवाड राहणार वेळु रोड श्रीगोंदा, ऋतिक जाधव राहणार कैकाडी गल्ली श्रीगोंदा, विशाल गायकवाड राहणार पंचायत समिती मागे श्रीगोंदा, समीर काझी राहणार महंमद महाराज मंदिरासमोर श्रीगोंदा व बापू माने राहणार शनी चौक श्रीगोंदा यांनी तू आमच्या गल्लीत दारू पिऊन यायचे नाही..! असे म्हणून, शिवीगाळ करत छातीवर, पोटात जोर-जोरात लाथांनी मारहाण केली. तसेच, लाकडी दांडक्याने पाठीवर पायावर तसेच उजव्या पायाच्या खुब्यावर मारहाण करून जखमी केले. त्यास झालेल्या जखमामुळे दिनांक 26 मे 2022 रोजी सायंकाळी 4:00 वाजण्याच्या सुमारास सचिन जाधव मयत झाला. म्हणून मयत सचिनचा भाऊ सागर विठ्ठल जाधव वय वर्ष 19 राहणार शिक्षक कॉलनी, श्रीगोंदा याने नमूद पाचही जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने नमूद पाच इसमांवर भादवि कलम 302, 143, 147, 148, 149 व 504 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरील मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास प्रक्रियेसाठी viscera राखून ठेवण्यात आला आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी