पत्रकारावरील हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे
____
By : Polticalface Team ,Sat May 28 2022 00:11:46 GMT+0530 (India Standard Time)
पाटोदा : शहरातील राजमहंमद दर्गाह खिदमतमास इनाम जमिन अतिक्रमित बांधकाम प्रकरणात पत्रकार शेख जावेद यांच्यावरील हल्लेखोरांवर पत्रकार हल्लाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाई प्रकरणात तहसिलदार आणि पोलीस प्रशासन यांच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल जिल्हा वक्फ आधिकारी बीड,मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आदि मागण्यांसाठी आज दि.२७ मे शुक्रवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती पाटोदा तालुकाध्यक्ष हमीदखान पठाण,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन बीडकर,पत्रकार शेख जावेद,काॅ.महादेव नागरगोजे, सय्यद मोसीन,सय्यद आदम,शेख ईरफान,शेख मोसीन,जमीर बशीर सय्यद,समीर बशीर सय्यद ,इरफान बशीर सय्यद,अब्रार बशीर सय्यद ..आदि सहभागी असुन उपविभागीय आधिकारी पाटोदा श्री.प्रमोद कुदळे,तहसिलदार रूपाली चौगुले यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
पाटोदा शहरातील सांगवी रोड स्थित सर्व्हे नंबर ७१४ मधिल राजमहंमद दर्गाह मस्जिद खिदमतमास इनाम जमिनीवर विनापरवाना अनाधिकृत
अतिक्रमित बांधकामाचे छायाचित्रे मराठी पत्रकार परीषद महाराष्ट्र राज्य पाटोदा तालुकाध्यक्ष सोशल मिडीया प्रमुख तसेच पाटोदा तालुका प्रतिनिधी सायं.दैनिक दिव्य वार्ता बीड,पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक वय ३८ वर्षे रा.पाटोदा.जि.बीड यांनी दि.१३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ३.४० वा. बातमीसाठी काढली म्हणून त्यांना समदखान हमीदखान पठाण व त्यांचा मुलगा नामे समीरखान समदखान पठाण यांनी लोखंडी गज व दगडाने डोक्यात वार केले त्यानंतर त्यांना पाटोदा ग्रामिण रूग्णालय व नंतर जिल्हा रूग्णालय बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात आहे.
तहसिलदार पाटोदा व पोलीस प्रशासनाच्या आदेशाची अवमानना केल्याबद्दल जिल्हा वक्फ बोर्ड आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करा :-डाॅ.गणेश ढवळे
तहसिलदार यांच्या आदेशावरून मंडळ आधिकारी विभाग पाटोदा/तलाठी यांनी स्थळपंचनामा करून अहवाल सादर केला होता ,अहवालात सदरील जागा ही वक्फ बोर्डाची असल्याने त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची असून त्यावर कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसुन येते असे नमूद करून सदरील जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण नगरपंचायत कार्यालय पाटोदा,पोलीस व कार्यालयाचे सहकार्य घेऊन तात्काळ काढण्यात यावे,सदर कामी विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. दि.५ मे २०२२ गुरूवार रोजी वक्फ बोर्डाचे आधिकारी सय्यद अमिनुलज्जमा व सहका-यांनी स्थळपंचनामा केला परंतु त्यानंतर अतिक्रमित बांधकाम काढण्याऐवजी पुर्ण करण्यात आले असून यात तहसिलदार यांच्या आदेशाची अवमानना व जिल्हा वक्फ बोर्ड बीड यांचा हलगर्जीपणा दिसुन येत असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच
जिल्ह्यातील वक्फ बोर्डाला जमिनीवर वक्फ बोर्डाचे फलक लावण्यात यावेत जमिनीचे सर्वेक्षण करावे,वर्षातुन एकदा जमिनीची पाहणी करावी ,खिदमतमास इनाम जमिन प्रकरणे निकाली काढावीत,जमिनीच्या संरक्षणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात याची काळजी घ्यावी म्हणून पोलीस प्रशासनाने वक्फ व्यावस्थापकांना पत्र देण्यात आले असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून संबधित प्रकरणात जिल्हा वक्फ बोर्ड जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
मुख्याधिकारी नगर पंचायत पाटोदा यांच्यावर अतिक्रमण प्रकरणात बोटचेपी भुमिका,जाणीवपूर्वक दुर्लक्ष :- हमीदखान पठाण(भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा )
____
राजमहंमद दर्गाह मस्जिद खिदमतमास इनाम जमिन सर्व्हे नंबर ७१४ मधिल खिदमतमास इनाम जमिनीवर विना परवाना अनाधिकृत बांधकाम होत असताना याविषयी तहसिलदार यांनी लेखी पत्रक दिलेले असताना कोणतीही कारवाई न करता जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपंचायत पाटोदा यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
पाटोदा पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाईस जाणीवपुर्वक टाळाटाळ :- पत्रकार शेख जावेद
पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणात प्रभारी पोलीस निरीक्षक पाटोदा पोलीस ठाणे. श्री.कोळेकर हे जवाब घेण्यापासुनच जाणीवपूर्वक पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून लेखी जवाब दरम्यान आश्वासन देऊन सुद्धा अद्याप पर्यंत पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कलम लावण्यात आले नसुन आरोपी मोकाट फिरत असून यामुळे त्यांची हिंमत वाढली असून पत्रकारांचे मनोधैर्य खचले असून हल्लेखोरांनी तहसिल,नगरपंचायत व पोलीस प्रशासनाला न जुमानता तहसिलदारांच्या आदेशाची अवमानना करत अनाधिकृत बांधकाम सुरूच असुन पूर्णत्वास नेत आहेत म्हणून तात्काळ पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष