मुंगूसवाडे गावाला परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणी

By : Polticalface Team ,Sat May 28 2022 20:01:02 GMT+0530 (India Standard Time)

मुंगूसवाडे गावाला परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणी पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील भालगांव येथील परिवर्तन प्रतिष्ठान एक सामाजिक संस्थेद्वारे मुंगूसवाडे येथील ग्रामस्थांना रोज टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. मुंगूसवाडे गावातील तरुण आणि गावकऱ्यांनी भालगांव येथील परिवर्तन प्रतिष्ठानकडे पाणीटंचाईमुळे गावातील पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी लेखी मागणी केली होती. त्यास तात्काळ प्रतिसाद देऊन परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भालगांवच्या लोकनियुक्त सरपंच डॉ. मनोरमा दिलीपराव खेडकर आणि प्रतिष्ठानचे सचिव तथा भाजपा तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर यांनी परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने मुंगूसवाडे येथील पाणी टंचाई लक्षात घेऊन तहानलेल्या लोकांची तहान भागवण्यासाठी दररोज पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू केला आहे. सरपंच डॉ.खेडकर यांनी परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक कामे केलेली आहेत. कोविड नियंत्रणासाठी खरवंडी, मुंगूसवाडे आणि मोहोज देवढे येथे कोविड सेंटर सुरू केले. बचत गटाच्या उत्पन्नाना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शेळ्यांचे वाटप, नवीन बचत गट स्थापना करणे यासाठी दैत्यनांदूर, मोहजदेवढे, येळी येथे महिला मेळावे घेतले. तसेच भालगांव ग्रामपंचायत व प्रतिष्ठान च्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे केलेली आहेत. गावात जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधून पटांगणात पेविंग ब्लॉक बसविले. आरोग्य उपकेंद्र विस्तारित केले. खरवंडी, मोहजदेवढे , तुळजवाडी, मिडसांगवी, हनुमानगड येथे हजारो वृक्ष लावले. अशी विविध विकासाची कामे परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने चालू आहेत. दरम्यान मुंगूसवाडे गावामध्ये पाण्याचा टँकर सुरू केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मुंगूसवाडे ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील नागरिकांनी परिवर्तन प्रतिष्ठानचे आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी