जमिनीच्या वादातून विवाहितेचा विनयभंग ,अश्लील शिवीगाळ , मारहाण केल्याप्रकरणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,Mon May 30 2022 10:54:22 GMT+0530 (India Standard Time)
जमीनी बाबत भाऊकीचा असलेला वाद विकोपाला जात, यातून घरात एकटी असलेल्या विवाहितेस अश्लील शिवीगाळ, मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी महेश गोविंद महांडुळे, बापूराव दगडू भोस व कांचन भानुदास महांडुळे (सर्व राहाणार रुईखेल, तालुका श्रीगोंदा) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, आरोपी महेश महांडुळे याने नुकतेच जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने 3.5 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ACB ने रंगेहाथ पकडले होते. यामध्ये जामीनवर सुटून आलेल्या सदर इसमाने घरी आल्यावर पुन्हा हा निराळा प्रकार केला आहे.
महांडुळे परिवारात शेत जमीन वाटपावरुन भाऊकीचे वाद सुरु आहेत. आमच्या वाट्याला आलेल्या जागेत कांद्याची वखार बांधू नये.! यासाठी फिर्यादी महिला व तिचे पती दिनांक 21 मे 2022 रोजी दिर भानुदास महांडुळे व जाव कांचन भानुदास महांडुळे यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांनी फिर्यादी महिलेला व त्याच्या पतीला शिवीगाळ करुन, जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरण जास्त वाढू नये म्हणून.. ते तेथून निघून गेले.
यावेळी पती व मुले गावात जातो म्हणून, सांगून गेले होते. सकाळी रुईखेल (ता.श्रीगोंदा) येथे घरात एकटी असलेल्या महिलेच्या घरात घुसून, महेश महांडुळे, बापूराव भोस व कांचन महांडुळे यांनी पती व मुलांची विचारपूस करुन दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर महेश महांडुळे व बापूराव भोस याने साडी व ब्लाऊज ओढून विनयभंग केल्याचे या फिर्यादीत महिलेने म्हंटले आहे. नमूद महिलेच्या फिर्यादीवरुन सदर आरोपींवर भा.द.वि. 323, 354, 452, 504 व 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी