इतर माध्यमांपेक्षा वर्तमानपत्राची विश्वासार्हता अधिक - मंत्री छगन भुजबळ
By : Polticalface Team ,
नाशिक,दि.३० मे:-बदलत्या काळानुसार अनेक माध्यमांचा विकास झाला असला तरी आज देखील वर्तमानपत्रांची विश्वासार्हता टिकून आहे. दैनिक भ्रमरने देखील आपली पन्नास वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून दैनिक भ्रमर निर्भीड आणि निष्पक्षपणे काम करणारे वर्तमान पत्र असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित दैनिक भ्रमरच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे,हेमंत टकले, माजी मंत्री शोभा बच्छाव, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुरेश भटेवरा, ऍड.विलास लोणारी,उद्योजक दिपक चंदे, सुजोय गुप्ता, अखिल रुंगठा, , भ्रमरचे संपादक चंदूलाल शाह, सौ.प्रतिभा शाह, ऍड.चैतन्य शाह, हितेश शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठी भाषिकांचे मराठी पत्रकारितेवर विशेष प्रेम असून महाराष्ट्रात सर्वाधिक मराठी दैनिक आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे वर्तमान पत्रांवर परीणाम होईल अशी शक्यता होती. मात्र तसा कुठलाही परिणाम झालेला नसून नागरिकांचा वर्तमानपत्रांवर अधिक विश्वास आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा वर्तमानपत्रांची विश्वासहार्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात सद्या बेरोजगारी, महागाई यासह अनेक प्रश्न उभे असतांना हनुमंताचा जन्म कुठे झाला यासारखे विषय पुढे आणली जात आहे. यामागे कुठलातरी राजकीय हेतू असू शकतो माध्यमांनी ते शोधलं पाहिजे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, वर्तमानपत्रातून चांगलं मार्गदर्शन व्हावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. पूर्वीच्या पत्रकारितेत आणि सद्याच्या पत्रकार अधिक बदल झालेला दिसतो. अनेकांचे वर्तमानपत्र कुणाच्या दबावाखाली आहे मात्र चंदूलाल शाह यांचे भ्रमर कुणाच्याही दबावाखाली नाही असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी