डॉ.पूजा खेडकरची बाजी, देशात ६७९ वी रँक डॉ. पूजा आयएएस झाल्याने आजोबा स्व. जगन्नाथ बुधवंत यांचे स्वप्न पूर्ण

By : Polticalface Team ,Tue May 31 2022 16:34:02 GMT+0530 (India Standard Time)

डॉ.पूजा खेडकरची बाजी, देशात ६७९ वी रँक डॉ. पूजा आयएएस झाल्याने आजोबा स्व. जगन्नाथ बुधवंत यांचे स्वप्न पूर्ण पाथर्डी प्रतिनिधी: देशाची पहिली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (३० मे) जाहीर झाला. यात पाथर्डी तालुक्यातील भालगावची कन्या एमएस (सर्जन) असलेल्या पूजा खेडकर हिने यात बाजी मारली आहे.

भालगाव च्या लोकनियुक्त सरपंच डाॅ.मनोरमा खेडकर आणि भालगावचे सुपुत्र दिलीपराव खेडकर (प्रदुषण आयुक्त) यांची कन्या डाॅ. पुजा दिलीपराव खेडकर हिने ३० मे रोजी जाहीर झालेले भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा -२०२१ या परीक्षेत अत्यंत नेञदिपक यश संपादन केले. या परीक्षेस बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांमधुन डाॅ. पुजा हिने ६७९ वा क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले. युपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमधुन भारतीय प्रशासकीय सेवा (आयए एस) भारतीय पोलीस सेवा ( आयपीएस ), भारतीय परकीय सेवा ( आयएफएस) भारतीय महसूल सेवा( आयआर एस) या सारख्या सेवेतील सर्वोच्च पदावर काम करणा-या अधिकाऱ्याची निवड केली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. यातील पहील्या टप्प्यात प्रीलीमरी परीक्षा म्हणजेच चाळणी परीक्षा होते. या मध्ये लाखो विद्यार्थ्यांमधुन एकुण जागेच्या मेरीटनुसार १० ते १५ पट मुले मुख्य लेखी परीक्षेसाठी निवडले जातात. मुख्य परीक्षेमधुन एकुण जागेच्या मेरीट नुसार तीन ते चार पट मुलाची मुलाखतीसाठी निवड होते आणि मुलाखती मधुन गणवत्तेनुसार फायनल लिस्ट तयार केली जाते.

सन २०२१ मध्ये झालेली युपीएससीची ही परीक्षा एकुण ९४८ जागांसाठी घेण्यात आली होती. त्यापैकी ६८५ जागेचा निकाल जाहीर झाला असुन उर्वरित जागेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. निकाल जाहीर झालेल्या या जागेत डाॅ. पुजा हिचा देशात ६७९ वा क्रमांक असुन महाराष्ट्रातुन या वर्षी निवड होणारी ती एकमेव मुलगी आहे. डाॅ. पुजा यांनी दिलेल्या पंसत क्रमांक नुसार त्यांना आयएएस ही सर्व्हिस आणि महाराष्ट्र केडर मिळण्याची त्यांना खाञी आहे. डॉ. पुजा यांनी त्यांचे अजोबा स्व. जगन्नाथराव पंढरीनाथ बुधवंत (आयएएस) यांच्या पासून जिल्हाधिकारी होण्याची प्रेरणा घेतली असुन आपल्या नातीने आपल्या नंतर आयएएस व्हावे, अशी त्यांचीही तीव्र इच्छा होती. त्यानुसार तिने आपल्या अजोबाचे आणि सर्व कुटुंबीयाचे स्वप्न पुर्ण केले.

डाॅ. पुजा यांनी एमबीबीएस , एमएस (सर्जन) असे शिक्षण पुर्ण केले असून, या परीक्षेच्या तयारीसाठी त्या दिल्ली येथे अभ्यास करत होत्या. डाॅ. पुजा यांचे युपीएससी परीक्षेमधुनच मागील वर्षी स्पोर्ट्स ॲथाॅरीटी ऑफ इंडिया मधील सहाय्यक संचालक या पदी निवड झालेली असून त्या सध्या दिल्ली येथे कार्यरत आहेत.

डॉ. पुजा यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशासाठी त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत असून भालगाव गावासाठी डाॅ. पुजा आयएएस होणे फार कौतुकाचा विषय आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.