By : Polticalface Team ,Tue May 31 2022 20:14:13 GMT+0530 (India Standard Time)
त्याचबरोबर मढेवडगाव सेवा संस्थेनेही ज्या सभासदांनी वसूल पात्र कर्जाचा वसूल दिला आहे अशा सभासदांची कोणती अडवणूक न करता त्या सर्व सभासदांना कर्ज वितरण केले आहे उर्वरित सभासदांना बँक धोरणाप्रमाणे वसूल झाल्यानंतर कर्ज वितरण निश्चित करण्यात येईल सेवा संस्थेने व बँकेने कर्ज वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली नसून बँक धोरणाप्रमाणे कर्जवाटप केले आहे अशा प्रकारचा लेखी पत्र 26/ 5/ 2022 रोजी उपोषणकर्त्यांना दीलेल आहे. तरीही केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी व खोट्यानाट्या प्रसिद्धीसाठी काही लोकांना जे संस्थेचे सभासद ही नाहीत व काही सातत्याने थकबाकीत आहेत अशांना घेऊन उपोषण करण्याची केवळ नोटंकी केलेली आहे उपोषणास बसलेल्या पैकी अंबादास मांडे यांनी वसूल पात्र कर्जाचा भरणा केल्यानंतर त्यांना 27/5/2022 रोजी लगेच कर्जवाटप केले आहे.
त्याच प्रमाणे राजेंद्र उंडे यांनी ही आपल्या वसुलास पात्र असणाऱ्या कर्जाचा भरणा केला त्यांनाही संस्थेने लगेच परत कर्जवाटप केले आहे परंतु जिजा बापू शिंदे यांनी स्वतः व कुटुंबातील इतर सभासदां कडे असणारे वसूल पात्र कर्जापैकी कुठलीही रक्कम न भरता संस्थेकडे परत कर्ज मागणी केलेली आहे ती बँकेच्या धोरणाप्रमाणे त्यांना करता येणार नाही त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या वसूल पात्र कर्जाचा भरणा केल्यास आम्हीही ताबडतोब त्यांना परत कर्ज देण्यास तत्पर आहोत परंतु अनेक वर्षे सहकारामध्ये काम केल्या नंतरही ते विनाकारण सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंटबाजी करत आहेत त्यामुळे संस्थेची व गावची निश्चित बदनामी होत आहे ती त्यांनी थांबवावी अशी त्यांना आमची विनंती आहे.
माझे वडील राम कृष्ण झिटे हे संस्थेच्या स्थापनेपासून चे जुने सभासद असून मीही अनेक वर्षापासून संस्थेचा सभासद आहे मीही अनेक वर्षे सत्ताधारी मंडळींच्या विरोधात काम केले परंतु आज पर्यंत मढेवडगाव सोसायटीमध्ये कधीही विरोधक म्हणून सभासदांची अडवणूक झाली नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे जिजा बापू शिंदे हे अनेक वर्षे सहकारी संस्थेमध्ये काम करत आहेत आजही पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांच्या सारख्याला व्यक्तीला जर जिल्हा बँकेचे धोरण समजत नसेल तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. हनुमान झिटे (कर्जदार सभासद सोसायटी) वाचक क्रमांक :