By : Polticalface Team ,Tue May 31 2022 20:18:46 GMT+0530 (India Standard Time)
तहसीलदार मिलिंद कुलथे यांना दिलेल्या निवेनात आंदोलनकर्त्यानी म्हटले आहे की मढेवडगाव सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून दि.१८ जून रोजी मतदान आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी अंतर्गत राजकारणाला सुरुवात करून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर विरोधक सभासदांना कर्जवाटपापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ३१ मार्च पूर्वी ३१० सभासदांनी विहित वेळेत कर्जाची परतफेड केली आहे व जिल्हा बँकेने कर्जफेड केल्यावर तात्काळ कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते परंतु सेवा सोसायटीने जिल्हा बँकेच्या आदेशाला हरताळ फासून मर्जीतील ३५ सभासदांना कर्जवाटप व एकाच कुटुंबातील पाच पाच व्यक्तींना कर्जवाटप करून संस्थेच्या संहितेला बाधा आणून बाकी नियमात बसणाऱ्या ३१० सभासदांना उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्जापासून वंचित ठेवण्याचा अजब प्रकार चालू केला आहे. सभासद शेतकऱ्यांना खरिप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, औषधे व शेतीच्या मशागतीसाठी पैशाची अत्यंत गरज आहे. पण सोसायटीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवावी लागेल. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, सहाय्यक निबंधक अभिमान थोरात व जिल्हा बँकेचे विकास अधिकारी वसंत जामदार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून कर्ज वाटप करण्याचे आदेश दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार,नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गिरमकर, डॉ. दत्तात्रय नागवडे, पोपट गोरे,गेना मांडे, साहेबराव उंडे, प्रवीण वाबळे,उपसरपंच दीपक गाडे, अमोल गाढवे, संतोष मांडे, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय गोरे, भाऊसाहेब पवार, अनंता पवार, किशोर इरोळे, तुकाराम उंडे, संदीप मांडे, विजय हरिहर, प्रशांत शिंदे, लक्ष्मण मांडे, महेंद्र उंडे, गणेश उंडे, गणेश वाबळे, युवराज साळुंके उपस्थित होते.
चौकट: गेणाभाऊ मांडे, सभासद शेतकरी - "संस्थेने राजकीय उद्देशाने सभासद शेतकऱ्यांचे कर्ज रोखून शेतकऱ्यांसाठी असलेल्या संस्थेच्या हिताला धक्का दिला आहे. संस्थेचे कापड विभाग, मशिनरी विभाग बंद पडला आहे तर खत विभाग व स्वस्त धान्य दुकान बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गैरव्यवहार प्रकरणी गेल्या पाच वर्षात चार संचालक व सचिव निलंबित होऊनही संस्था मात्र पारदर्शक कारभाराचा डंका पिटत आहे. आमच्यावर अन्याय केला तर कायदेशीर लढाई करू." वसंत जामदार, तालुका विकास अधिकारी " जिल्हा बँकेच्या ध्येय धोरणानुसार बँक कर्ज वाटप करत आहे. कुणाही पात्र सभासदांची येथून पुढे अडवणूक होणार नाही. याची दक्षता घेऊन उपोषणकर्त्यांनी बँकेला व संस्थेला सहकार्य करावे व उपोषण स्थगित करावे. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष