आदिवासी पारधी समाज संघटनेचा नगरपरिषद कार्यालयावर धडकला बोंबाबोंब मोर्चा; बेघर कुटुंबाला तातडीने घरे द्या

By : Polticalface Team ,Thu Jun 02 2022 22:23:04 GMT+0530 (India Standard Time)

आदिवासी पारधी समाज संघटनेचा नगरपरिषद कार्यालयावर धडकला बोंबाबोंब मोर्चा; बेघर कुटुंबाला तातडीने घरे द्या श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीत बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पडणाऱ्या मुख्याधिकारी मंगेश देवरे व प्रशासनाचा तीव्र निषेध करत आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. बळे सर, बसपाचे सुनील ओहोळ, आरपीआयचे राजा जगताप, लोकशिक्षणचे प्रमोद काळे यांच्यासह अतिक्रमणधारक स्त्री-पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या आंदोलनाच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नंदकुमार दुधाळ यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा नेमण्यात आला होता.

याबाबत वृत्त असे की, श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या नियंत्रणाखाली तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने दि. २५ ते २८ मे या कालावधीत शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली. यामध्ये बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पाडण्यात आली. या कुटुंबातील काही कुटुंबप्रमुख नगरपरिषदमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. ज्यांची घरे उध्वस्त झालीत त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून घरकुल मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच राहत्या घराखालची जागेची नोंद करून तातडीने घरकुल मिळावे या मागणीसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली बेघर झालेल्या आदिवासी पारधी समाजाच्या वतीने बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे म्हणाले की, उन, वारा, पाऊस याचा कोणताही विचार न करता प्रशासनाने आदिवासी पारधी समाजाची घरे जाणीवपूर्वक काढलीत असे आमचे मत असून ज्या काळामध्ये मानसमाणसाच्या जवळही जात नव्हती त्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तींना अग्निदाह देण्याची कामे याच आदिवासी पारधी समाजाच्या सफाई कामगारांनी केली असताना पुनर्वसन न करता त्यांची घरे पाडल्यामुळे पालिकेची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने आमच्या मागण्या मान्य करून बेघरांना घरे द्यावीत अशी मागणी केली.

तसेच जिल्हाध्यक्ष अजित भोसले म्हणाले की, आज आम्ही तहसिल कार्यालय ते श्रीगोंदा नगरपरिषद असा शांततेत काढलेला मोर्चा हा पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आहे. मात्र जर आम्हाला येथे न्याय मिळाला नाही तर आम्ही भविष्यात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलन छेडणार आहोत. प्रा. बळे सर म्हणाले की, आदिवासी पारधी समाजामध्ये अनेक चालीरीती, रूढी पाळल्या जातात. त्यामुळे त्यांना घरे देत असताना त्यांच्या संस्कृतीचाही विचार पालिका प्रशासनाला करावा लागणार आहे.

दरम्यान नगरपरिषदेचे गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी मंगेश देवरे आणि नगरसेवक आणि आदिवासी पारधी समाज संघटनेचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत बेघर कुटुंबाना त्यांच्या सोयीनुसार घरे बांधून देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी सुकली चव्हाण, राहुल भोसले. आपल्या काळे, पहिल्या काळे, अमृत काळे, गुलाब काळे, धीरज भोसले, स्वप्नील पवार रामसिंग भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीमध्ये दोन ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा विचार करून बायपास येथील १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ बेघर कुटुंबाना घरकुल मंजूर करून घरे बांधून देण्यात येतील. तोपर्यंत त्यांना तात्पुरता निवारा करून देण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी यावेळी दिली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.