लिंबागणेश सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रविंद्र निर्मळ यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत तर्फे सत्कार:-डाॅ.गणेश ढवळे

By : Polticalface Team ,Thu Jun 02 2022 23:24:57 GMT+0530 (India Standard Time)

लिंबागणेश सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रविंद्र निर्मळ यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायत तर्फे सत्कार:-डाॅ.गणेश ढवळे (प्रतिनिधी) : लिंबागणेश दिनांक ३१ मे मंगळवार रोजी लिंबागणेश येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे युवा नेते तथा आंबेडकरवादी नेते मा. रविंद्र रघुनाथ निर्मळ यांची तर व्हाईस चेअरमनपदी पिंपरनईचे सुंदर धोडींबा वायभट यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर संचालक चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा लिंबागणेश ग्रामपंचायतच्या वतीने शेतकरी, सत्कार करण्यात आला. सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्यापुढाकारातून सेवा सोयाटीची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. यात शिवसेनेचे ५, राष्ट्रवादीचे २, भाजपा ३ व शिवसंग्रामचे ३ असे एकुण १३ संचालक बिनविरोध निवडून आले.

लिंबागणेश पंचक्रोशितील सर्वात मोठी व जुनी अशी सोसायटी आहे. लिंबागणेश तसेच बेलगाव, पिंपरनई, सोमनाथवाडी, पोखरी, कोळवाडी असून यामध्ये १००० सभासद • आहेत. आतापर्यंत सोसायटी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या, भाजपाच्या ताब्यात होती. यावर्षी • सगळे पक्षाच्या कार्यकत्यांनी व नेत्यांनी एकत्र येवून सोसायटी बिनविरोध काढली. यात नुतन संचालक मंडळ दिंगाबर शेळके, शिवाजी रणखांब, साहेबराव फरताळे, शहाजी फाळके, नवनाथ मुळे, सुंदरराव जाधव, बिबिशन वाणी, रमेश दाभाडे, खिल्लारे लक्ष्मण (दादा) तसेच महिला प्रतिनीधी सौ. शांताबाई पोपटराव पवार, सौ. सोनाली रविंद्र निर्मळ यांचा समावेश आहे.

नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीनंतर ग्रा.पं. कार्यालय, आंबेडकर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, पंचशिल नगर येथे फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर महापुरूषांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवडुक निर्णय अधिकारी डावकर साहेब यांनी चोख काम पाहिले तर, गटसचिव अधिकारी सौ. वाघमारे मॅडम यांनी काम पाहिले. लिंबागणेश सेवा सोसायटी बिनविरोध काढण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतली, मेहनत घेतली असे भाजपाचे युवा नेते, तालुकाध्यक्ष तथा सरपंच स्वप्निल भैय्या गलधर तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य राजाभाऊ आप्पा गिरे, पंचायत समितीचे माजी सदस्य बालासाहेब जाधव, समाजरत्न पुरस्कार विजेते मा. डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, बाळासाहेब वायभट सरपंच पिपरनई. सरपंच बाबासाहेब आप्पा खिल्लारे, बेलगाव सरपंच अश्विनी शेळके, सोमनाथवाडी सरपंच आकाश शेळके, लिंबागणेश माजी सरपंच बाळासाहेब मुळे, शालेय समिती अध्यक्ष मा. सुरेश निर्मळ तसेच उपसरपंच शंकरजी वाणी इत्यादी सर्व पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांचे रविंद्र निर्मळ यांनी आभार मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष