शाळांना जूनपासून सीसीटीव्ही बंधनकारक,शिक्षणमंत्र्यांचे आदेश ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणी मान्य :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Thu Jun 02 2022 23:27:18 GMT+0530 (India Standard Time)

शाळांना जूनपासून सीसीटीव्ही बंधनकारक,शिक्षणमंत्र्यांचे आदेश ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणी मान्य :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सुस्थितीत व देखभाल करण्यात येत असलेले सीसीटीव्ही बसविण्यात यावेत व दिरंगाई करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे शिक्षणमंत्री यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले असून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वी जूनपासून सीसीटीव्ही बसविण्यात यावेत याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात एकुण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ६५ हजार शाळा असुन त्यापैकी सद्यस्थितीत १६२४ शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत शाळेमध्ये जिल्हा नियोजन समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी,सीएसआर फंड,लोकसहभागातुन किंवा लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतुन करण्याबाबत सुचना देण्यात आल्याचे नमुद केले आहे.


आंदोलनानंतर उपआयुक्तांचे सीईओ जिल्हापरिषद बीड यांना सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश:-डाॅ.गणेश ढवळे
____ दि.११ एप्रिल रोजी मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सीसीटीव्ही बसविण्यात यावेत यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते यांची दखल घेऊन उपआयुक्त (आस्थापना)औरंगाबाद विभाग सुरेश बेदमुथा यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांना निवेदनाच्या अनुषंगानेच कार्यवाहीबाबत निर्देश दिले होते. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर ,शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव,बाळासाहेब मोरे,मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,राजेंद्र आमटे,अक्षय माने,नितिन सोनावणे आदिंनी सहभाग घेतला होता.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी