नेमकं प्रशासन मुर्दाड झालंय,लोकप्रतिनिधी की जनता ?? :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Sun Jun 05 2022 08:44:23 GMT+0530 (India Standard Time)
दि.३ जुन रोजी माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे मावशीकडे आलेल्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथील दिपाली गंगाधर बरबडे व आनंदगाव तालुक्यातील परतुर येथील स्वाती अरूण चव्हाण यांचा अतिरिक्त वाळुउपशामुळे झालेल्या खड्ड्यात पाण्यात बुडुन मृत्यु झाला.
गेवराई तालुक्यातील शहजानपुर चकला येथे ४ मुलांचे बळी;गुन्हे दाखल झाले पुढं काय??
____
दि.६ फेब्रुवारी रोजी गेवराई तालुक्यातील शहजानपुर चकला येथील सिंदफणा नदीपात्रात खेळायला गेलेल्या ४ शाळकरी मुले बबलु गुणाजी वक्ते,गणेश बाबुराव ईनकर,आकाश राम सोनावणे,अमोल संजय कोळेकर यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला होता.३०० लोकांचा जमाव जमला तरीसुद्धा रात्री उशिरापर्यंत एकही जबाबदार आधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता.
लांजेवार समितीचं पुढं काय झालं?गुन्हे दाखल झाले??वाळु उपसा का थांबला नाही???
___
गेवराई तालुक्यातील शहजानपुर चकला येथील शाळकरी मुलांच्या मृत्युप्रकरणात गंभीर दखल घेत अपर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली दि.९ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात जाऊन स्थळपंचनामा करून त्यानंतर ४ वाळुमाफियांवर गुन्हा नोंदवून तिघांना पकडण्यात आले एक फरार असुन चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जाते पण वाळु उपसा अद्याप थांबलाच नाही???
बोलघेवडे पालकमंत्री धनुभाऊ ,कठोर कारवाई करू पण कधी अजुन किती जणांचे बळी गेल्यावर??
____
गेवराई तालुक्यात वाळु तस्करी करणा-या हायवामुळे माणसं चिरडली जाणे नित्याचीच बाब झाली असून घटना घडल्यानंतर जिल्हाप्रशासनास आधिक तपास व चौकशी तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असुन दोषी कोणीही असो कठोर कारवाई करण्यात येईल एवढं मिडीया समोर बोललं की झालं. पुढचं पाठ आणि मागचं सपाट अशी परिस्थिती आहे.
स्थानिक ग्रामविकास यंत्रणा,महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी:-डाॅ.गणेश ढवळे
____
दि.१४ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून ४ शाळकरी मुलांच्या मृत्युप्रकरणात केवळ वाळुमाफियांवर गुन्हे दाखल करणे पुरेसे नसून जबाबदार स्थानिक ग्रामविकास यंत्रणा तसेच महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती कारण वाळुमाफियांशी संगनमत करून महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर नागरीकांचा रोष होता परंतु अद्याप कारवाई झालीच नाही.
वाचक क्रमांक :