अकोला सोसायटीवर मोहटादेवी जानपीर बाबा पॅनलची एकहाती सत्ता
By : Polticalface Team ,Mon Jun 06 2022 20:41:05 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील अकोला सेवा सोसायटी निवडणुकीत मोहटादेवी जानपीर बाबा पॅनल ने १३ पैकी १२ जागेवर दणदणीत विजय मिळवून विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला.
अकोला येथील प्राथमिक शाळेत मतमोजणी करण्यात आलेल्या सोसायटी निवडणुकीत माजी सरपंच अनिल ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील मोहटादेवी जानपीर बाबा पॅनलने १५० मतांच्या फरकाने विजय मिळवत सेवा सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली. गेल्या तीस वर्षांपासून आपल्याकडे असलेली सत्ता राखण्यात यश मिळवले.
विजया नंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.सी. देवळालीकर यांनी कामकाज पाहिले.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी विजयी संचालकांचा सत्कार करुन अभिनंदन केले.
या निवडणुकीत सुनिल ढाकणे, सुखदेव गर्जे, नारायण गर्जे, मारुती पालवे, बाळासाहेब गर्जे, सुभाष घुगे, विठ्ठल डुकरे, विजयकुमार पालवे, कुसुम धायतडक, अनिता गर्जे, संजय पंडित ,प्रकाश थोरात हे सर्व उमेदवार सुमारे १५० मतांच्या फरकाने विजयी झाले. तर बाळासाहेब घायतडक, बाळासाहेब बबन गर्जे यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले.
विजयानंतर पॅनल प्रमुख अनिल ढाकणे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे करणार असून सहकार मंत्र्यांकडे पाठपुरावा करून सोसायटीची इमारत बांधण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू. तसेच सोसायटीच्या माध्यमातून फळबागेसाठी चालना देण्याचे काम करू. शेतकरी हिताच्या व त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू, असे ढाकणे म्हणाले .
या निवडणुकीत डॉ. गणेश घायतडक , अर्जुन धायतडक, प्रदीप पालवे, बाळासाहेब गर्जे, कृष्ण धायतडक, दौलत गर्जे, राजेंद्र गर्जे, बंटी गर्जे, संतोष गर्जे, सुनील पालवे, धर्मा गर्जे, पोपट डुकरे, महादेव गर्जे, जना गोसावी, गोविंद गर्जे, हबीब शेख, दिलीप घुगे, पंकज शिरसाट, राधाकिसन दातीर ,नारायण घायतडक हेमंत नागरे, बालाजी साबळे, गणेश ढाकणे, बापू केकान,भक्तराज गर्जे, शिवा गर्जे, बाळासाहेब ढाकणे, रामनाथ ईधाटे ,बाबूलाल शेख, संजय ढाकणे ,रामा डुकरे ,विठ्ठल पालवे, रणजित थोरात आदींनी विशेष परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी