गर्भपातातील मातेच्या मृत्युप्रकरणात जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यीय समिती नेमली :-अड.संगिता धसे,डाॅ.गणेश ढवळे

By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 13:57:10 GMT+0530 (India Standard Time)

गर्भपातातील मातेच्या मृत्युप्रकरणात जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यीय समिती नेमली :-अड.संगिता धसे,डाॅ.गणेश ढवळे नियमबाह्य गर्भपात प्रकरणातील माताच्या मृत्युप्रकरणात अड.संगीता धसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातील सदस्य सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन बीडकर ,शेख युनुस च-हाटकर,यांनी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांची भेट घेऊन चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केल्यानंतर अखेर डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यांची समिती नेमली असुन डाॅ.संतोष शहाणे,वैद्यकीय अधिक्षक रायमोहा बीड,डाॅ.अभिषेक जाधव,वैद्यकीय आधिकारी जिल्हारूग्णालय बीड,डाॅ.राजश्री शिंदे वैद्यकीय आधिकारी जिल्हारूग्णालय बीड,श्री.प्रकाश सानप,कार्यालयीन अधीक्षक जिल्हारूग्णालय बीड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर माहीतीस्तव
बीड जिल्हारूग्णालयात नियमबाह्य गर्भपातामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३ मुलीच्या सीताबाई गणेश गाडे वय ३० वर्षे रा.बक्करवाडी ता. बीड यांच्यामुळे बीड जिल्ह्य़ातील मुलीचे लिंगनिदान करणे व मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा गर्भपात करण्याचे पातक केवळ पैशासाठी काही वैद्यकीय व्यावसायाला काळिमा फासणा-या निष्ठुर लोकांकडुन होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज असून ३ मुलींची आई असलेल्या सीताबाई यांची ४ थ्यांदा गर्भचाचणी कुठे केली?? कोणत्या दवाखान्यात केली ? गर्भाशयाची पिशवी फाटुन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यु झाल्याचे वैद्यकीय तज्ञांनी शवविच्छेदन केल्यानंतर नमुद केले असून संबधित प्रकरणात जर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या असतील तर कोणत्या मेडीकल मधुन घेतल्या आदिंची चौकशी करण्याची गरज असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी अड.संगीता धसे यांनी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली होती. बीड जिल्हा यापुर्वीच गर्भलिंग निदान व मुलींचा गर्भपात करून मुलींचा जन्मदर खालावल्या प्रकरणात बदनाम झाला असून त्यामधुन बीड जिल्ह्य़ाची मोठ्याप्रमाणात बदनामी झाल्यानंतर जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेने जनजागृती बरोबरच कठोर उपाययोजना करत मुलींचा जन्मदर समाधानकारक उंचीवर आणुन ठेवला असतानाच या प्रकारे बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व मुलींच्या गर्भपाताचे वास्तव समोर आल्यामुळे जिल्हा हादरला असुन मुलाच्या हव्यासापोटी मुलींचे गर्भपात पैशासाठी काही वैद्यकीय व्यवसायिकांकडुन करण्यात येत असून संपुर्ण वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन,आदि शिष्टमंडळात सहभागी होते. अड. संगीता धसे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष