खुली व्यायाम शाळा गेली चोरीला, जिल्ह्यातील व्यायाम शाळांच्या चौकशीची मागणी

By : Polticalface Team ,Fri Jun 10 2022 13:59:58 GMT+0530 (India Standard Time)

खुली व्यायाम शाळा गेली चोरीला, जिल्ह्यातील व्यायाम शाळांच्या चौकशीची मागणी बीड तालुक्यातील मौजे. लिंबागणेश येथील ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्यामार्फत ग्रामिणभागामधील खुल्या व्यायाम शाळेत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून शाळा न बांधताच देयके अदा करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी गावाच्या बाहेर ग्रामस्थांना उपयोगी नसुन केवळ राजकीय नेत्यांचे बगलबच्चे पोसण्यासाठी पाणी,रस्ता आदि मुलभुत सुविधांची आवश्यकता असताना ते टाळुन खुल्या व्यायाम शाळेच्या माध्यमातून निधीचा अपहार करण्यात आला असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी बीड,मुख्य कार्यकारी जिल्हापरिषद बीड,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.
लिंबागणेश येथील खुली व्यायाम शाळा चोरीला;पोलीस अधिक्षक यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
___ बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल ४ लाख रूपये किंमतीची आ.संदिप क्षीरसागर यांच्या फंडातुन ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि.१७ मार्च २०२२ रोजी काम सुरू व दि.१८ मार्च २०२२ रोजी काम पुर्ण झाल्याची नोंद असलेले फलक आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या गोदामात आढळुन आले असून संबधित प्रकरणात चौकशी करून जबाबदार अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड व कंत्राटदार तसेच देयके अदा करणारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
मसेवाडी येथील खुली व्यायाम शाळा गोसावी समाजाच्या स्मशानभुमीत
___ बीड तालुक्यातील मौजे. मसेवाडी येथील आ.फंडातुन ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत खुली व्यायाम शाळा साहित्य गोसावी समाजाच्या स्मशानभुमीत ठेवण्यात आले असल्याबद्दल गोसावी सामाजात तिव्र नाराजी आहे. त्यामुळेच स्मशानभुमीत व्यायाम कोण करणार असा प्रश्न मसेवाडीकर विचारत आहेत??
पंचायत राज समितीला तक्रार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यायाम आंदोलन
____ बीड जिल्ह्य़ातील संपूर्ण खुल्या व्यायाम शाळेची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी याविषयी पुढील आठवडय़ात येणा-या पंचायत राज समितीला प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार असुन सोमवार रोजी जिल्हाधिकारीसाहेब कार्यालयासमोर " व्यायाम शाळा आंदोलन करण्यात येणार आहे असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व्यायाम काढून निषेध व्यक्त करणार. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी