वाळू तस्करांचा हैदोस , चक्क तहसीलदाराला डंपर खाली चिरडण्याचा प्रयत्न

By : Polticalface Team ,Sat Jun 11 2022 19:01:14 GMT+0530 (India Standard Time)

वाळू तस्करांचा हैदोस , चक्क तहसीलदाराला डंपर खाली चिरडण्याचा प्रयत्न कर्जत तालुक्यातील कापरेवाडी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि त्यांच्या भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला . यावेळी प्रसंग सावधान राखीत वाहन बाजूला केल्याने पथकातील कर्मचारी बचावले .

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा २२ किमी पाठलाग करून पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे . शुक्रवार , दि .१० रोजी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना कापरेवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली . तहसीलदार आगळे यांनी तात्काळ पथक तयार करीत कापरेवाडी गाठले .

यावेळी पथकास ( एमएच १७ , बी.वाय ७६७३ ) क्रमांकाचा डंपर येताना दिसला असता पथकाने तपासणी केली त्यात वाळू आढळून आली असता वाहन चालकाकडे परवाना असल्याची माहिती घेत असताना त्याने विना परवाना वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगितले . डंपर कोणाच्या मालकीचा असल्याची विचारणा केली असता चालकाने विनोद उर्फ आबा कदम ( माहीजळगाव ) यांच्या मालकीचा असल्याचे पथकास सांगितले .

त्यानंतर तहसीलदार आगळे यांनी सदरचा डंपर तहसील कार्यलयास घेण्यास सांगितले . डंपर कर्जतच्या दिशेने घेत असताना चालकाच्या भ्रमणध्वनीवर वाहनमालक कदम याचा फोन आला असता त्याने चालकास डंपर कर्जतला घेवून जाण्यास मज्जाव केला असता चालकाने तात्काळ डंपर भरारी पथक असलेल्या वाहनाच्या ( एमएच 16 बीझेड 7172 ) विरुद्ध दिशेने घेत तहसीलदार असलेल्या वाहनाच्या अंगावर घालत कापरेवाडीहुन शिंदेवाडी मार्गे टाकळी खंडेश्वरीकडे पळवला . यावेळी शिंदेवाडी लगत असलेल्या सोलर प्लांटच्या जवळ रस्त्यावरच वाळूने भरलेला डंपर खाली करीत भरधाव टाकळीकडे गेला .

यावेळी रस्त्याची लांबी मोठी असल्याने तहसीलदार आगळे यांनी आपली चारचाकी गाडीने तब्बल 22 किमी डंपरचा पाठलाग करीत वाहनचालक आणि क्लिनर यास ताब्यात घेतले तलाठी गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संबंधित वाहनमालक विनोद उर्फ आबा दादा कदम ( रा . माहीजळगाव ) , वाहनचालक लक्ष्मण भुजंग काळे ( रा . वालवड ) , क्लिनर शुभम भाऊसाहेब मंडलिक ( रा . सितपुर ) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात भादवी कलम 1860 नुसार 307 , 353 , 379 , 427 , 504 , 33 यासह खाण व खनिजे ( विकास व विनियमन ) अधिनियम 1957 चे कलम 22 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 ( 7 ) ( 8 ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कारवाई प्रांताधिकारी डॉ . अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे , अव्वल कारकून संजय दुधभाते , अशोक नरोड यांच्यासह तलाठी धुलाजी केसकर , अविनाश रोडगे , गणेश सोनवणे , दीपक बिरुटे , पोलीस कर्मचारी देविदास पळसे , नितीन नरुटे यांनी पार पाडली . मुजोर वाळू तस्करावर कडक कारवाई करण्याची मागणी कर्जत तालुक्यात भीमा आणि सीना नदीतून विनापरवाना अवैध वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते .

महसूल आणि पोलीस पथक कारवाई करीत असताना मुजोर असलेले वाळूतस्कर त्यांना अडथळा आणून चक्क जीवे मारण्यापर्यंत त्यांची मजल जात आहे . यांना वेळीच अटकाव आणणे महत्वाचे असून अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याचे नवल वाटणार नाही . त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत यांचा बिमोड करणे आवश्यक आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी