लग्नाचा बहाणा करून 2,50,000 लाख रुपये लुटणारी टोळी नवरी मुलीसह अटक.

By : Polticalface Team ,Sun Jun 12 2022 16:52:05 GMT+0530 (India Standard Time)

लग्नाचा बहाणा करून 2,50,000 लाख रुपये लुटणारी टोळी नवरी मुलीसह अटक.

दिनांक 10/06/2022 रोजी फिर्यादी रामदास शिवाजी साबळे वय 30 वर्ष रा.भानगाव तालुका श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की यातील आरोपी यांनी संगनमत करून यातील फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केली याबाबतच्या फिर्यादी वरून श्रीगोंदा गु.रजी.नं 397/2022 भा.द.वि.कलम 420,406,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यांमध्ये फिर्यादी याच्यासोबत यातील आरोपी काजल उर्फ कांचन अनिल श्रीवास्तव रा.वर्धा हिने लग्न केले होते. लग्नानंतर दोन दिवसांनी ती आरोपी अजित धर्मपाल पाटील रा.हिंगणघाट वर्धा याच्यासोबत निघून जात होती फिर्यादी व त्याचे नातेवाईक यांनी त्यांना श्रीगोंदा पोलीस स्टेशनला घेऊन आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी फिर्यादी याच्यासोबत लग्नाचा बहाणा करून त्याच्याकडून 2,50,000/-रुपये रोख घेतले फिर्यादी सोबत लग्न केलेल्या मुलीचे अगोदरच लग्न झाले होते. तिचा पती आरोपी अजीत हा लग्नामध्ये नवरी आरोपी हिचा भाऊ म्हणून आलेला होता इतर तीन आरोपी पैकी एक जण मामा म्हणून तर दोघे नवरीचे काका म्हणून लग्नाला हजर होते. पाचही आरोपींनी एकत्रित कट करून फिर्यादी यांच्या वडिलांकडून 2,50,000 रुपये घेऊन फिर्यादी सोबत लग्न करून त्यांची फसवणूक केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

गुन्ह्यामध्ये खालील पाच आरोपींना अटक केली असून सध्या पोलिस कस्टडी मध्ये रिमांड मध्ये आहेत.
काजल उर्फ कांचन अनिल श्रीवास्तव वय 19 वर्ष राहणार इकवार बाजार,वार्ड नंबर 15 वर्धा,तालुका जिल्हा वर्धा (नवरी)
अजित धर्मपाल पाटील वय 22 वर्ष रा. कात्री पोस्ट ता. हिंगणघाट जि. वर्धा (नवरीचा भाऊ)
बळीराम नरोजी नलबले वय 55 वर्ष रा.वाळकेवाडी ता.लोहा जि. नांदेड (नवरीचा काका)
माधव काशिनाथ सवणे वय 55 वर्ष रा. माळबोरगाव ता.किनवट जि.नांदेड (नवरीचा मामा)
दिगांबर देवराम आंबुरे वय 35 वर्ष रा.माळबोरगाव ता.किनवट जि.नांदेड (नवरीचा काका)
वरील आरोपी यांनी बनावट लग्न करून आणखी अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली आहे का याबाबत तपास चालू आहे वरील आरोपी यांनी भाऊ,मामा, काका अशी बनावट नाते सांगून लग्नाकरिता हजर होते प्रत्यक्षात ते एकमेकांचे नातेवाईक नाहीत तरी परिसरातील नागरिकांनी मुला-मुलींचे लग्न करताना नातेवाईक मुलगा-मुलगी ओळख गाव,पत्ता,शिक्षण,नोकरी याबाबत व्यवस्थित माहिती घ्यावी जेणेकरून त्यांची वरील प्रमाणे फसवणूक होणार नाही.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले सहाय्यक फौजदार गावडे, मपोना पुराणे, पोलीस कॉन्स्टेबल सुपेकर पोलीस कॉन्स्टेबल साखरे यांनी केली आहे.
प्रकाश म्हस्के
संपादक

कोहलेर पावर इंडिया कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी (शुगर) ५० कॉम्प्युटर, लॅपटॉप, वॉटर कुलर व मोठे झेरॉक्स मशीन भेट.

स्वर्गीय आमदार सुभाष आण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे. आमदार राहुल कुल.

एनडीए सरकारच्या वाचाळवीरांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:- युवक काँग्रेस

सहकार महर्षी बापूंनी सहकाराच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला - प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा; 40,000 महिलांना कार्यक्रमासाठी आणायला 400 बसगाड्या

स्वामी चिंचोली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

वडगाव शेरी मतदार संघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या वांगदरी येथील अंबिका मातेचे मंदिरात व्याख्यान        

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य निरीक्षक पदी भानुदास वाबळे यांची नियुक्ती

यवत येथील गणेश विसर्जन मिरवणूकीत कार्यकर्ते झिंग झिंगाट. मंडळांच्या प्रमुखांनमुळं विसर्जन पार. पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर. मागच्या दाराने दारु विक्री

गिरीम गावच्या सरपंचपदी संगिता किसन मदने (पाटील)यांची बिनविरोध निवड

पो. कॉ.ज्ञानेश्वर मोरेच्या रुपात खाकीतला एक कोहिनूर हरपला

अजितदादांनी या मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद

इंदापूरमध्ये शरद पवारांकडून उमेदवारीसाठी आप्पासाहेब जगदाळे यांच्या समर्थकांच्या हालचाली.! संकटसमई धावून आलेल्या आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळणार..?

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात पहा तारीख आणि वेळ

अरविंद केजरीवाल देणार राजीनामा, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण होणार विराजमान

पितृसेवा म्हणजेच भगवंताची उत्तम सेवा होय -सोमनाथ महाराज बारगळ

श्री व्यंकनाथ विद्यालयात शिक्षक- पालक मेळावा उत्साहात संपन्न