गैरव्यवहार प्रकरणी सचिन दिलीप गायकवाड याला आर्थिक गून्हेशाखे कडून श्रीगोंदा येथून अटक.
By : Polticalface Team ,Thu Jun 16 2022 00:10:13 GMT+0530 (India Standard Time)
मिळालेल्या माहतीनुसार नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल गुह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा. श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंदा येथून अटक केली आहे. तपासी अधिकारी (पोलीस निरीक्षक) आव्हाड यांच्या पथकाने नमुद कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माननीय न्यायालयाने आरोपी सचिन गायकवाड याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर मा. न्यायालयाने गायकवाड याला दिनांक 20 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी व 28 संशयास्पद कर्जदारांचे कर्जखाते, तत्कालीन अध्यक्षांचे निकटचे कार्यकर्ते सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध 150 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी गायकवाड याच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने रकमा जमा झाल्या होत्या..?, याचा तपास सुरू करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्या खात्यात बँकेने परस्पर पैसे वर्ग केल्याचे तपासामध्ये उघड झाले होते. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.
फिर्यादी गांधी यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयासमोर मांडले आणि आरोपी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानतंर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड याला अटक केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी