विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व प्रमुख गावांतून बससेवा तातडीने पुर्ववत करा
श्रीगोंदा तालुका व शहर एन एस यु आय ची मागणी
By : Polticalface Team ,Thu Jun 16 2022 18:15:33 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
जून महिना म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी महत्वाचा महिना असून येत्या काही दिवसांत शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीचे थैमान व त्यानंतर एस.टी.महामंडळाचा संप,आंदोलन याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती, त्याचीच खबरदारी म्हणून यंदाच्या चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय अथवा अडचण होऊ नये या हेतूने स.म.शी.ना.कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी च्या जिल्हा अद्यक्षा सौं अनुराधा ताई नागवडे, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितल भैया वाबळे यांच्या आदेशानुसार श्रीगोंदा तालुका व शहर *एन एस यु आय* (विद्यार्थी काँग्रेस ) संघटनेच्या वतीने आज श्रीगोंदा बसस्थानकाचे आगारप्रमुख श्री. प्रवीण शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येक गावात महामंडळाच्या वतीने तातडीने बस सेवा सुरु करून आणि श्रीगोंदा बस स्थानकातुन ज्यादा बसेसची व्यवस्था करून तालुक्यातून श्रीगोंदा येथे शिकायला येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला मदत व्हावी ह्या दृष्टीने अंमलबजावणी करावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हिच या मागची आमची भूमिका असून महामंडळाने आम्हाला सहकार्य करावे अशी या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी श्रीगोंदा तालुका एन. एस.यू.आय अध्यक्ष आदिल शेख, शहराध्यक्षक्ष धीरज खेतमाळीस तालुका उपाध्यक्ष सागर बेल्हेकर, युवक काँग्रेस सोशल मीडिया समन्वयक भूषण शेळके, सागर नलावडे,ओमकार शेळके, विशाल पवार, संकेत वागस्कर, किरण बायकर आदी विद्यार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी