सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधाकेंद्राला सुरवात

By : Polticalface Team ,Thu Jun 16 2022 23:01:12 GMT+0530 (India Standard Time)

सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधाकेंद्राला सुरवात श्रीगोंदा -सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाविद्यालयामध्ये प्रशस्त कॉम्प्युटर सेंटर, इंटरनेट सुविधा, मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी तज्ञ शिक्षक वर्ग, प्रवेशासाठी आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती. तरी शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांनी या सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. प्रवेशासाठी नोंदणी करिता ३० जून पर्यंत मुदत आहे.राज्याच्याउच्च तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी दहावीच्या निकालापूर्वी पोर्टलद्वारे रेजिस्ट्रेशन करू शकतात. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सध्या निकालाची गरज नाही फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांकरता बोर्डाकडून प्राप्त झालेला सीट नंबर द्यायचा आहे. निकाल घोषित झाल्यानंतर सॉफ्टवेअरद्वारे सदर विद्यार्थ्यांचे मार्क्स आपोआप नोंदले जाणार आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये आणि लवकरात लवकर या प्रक्रियेत सहभागी व्हावे. १० वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश घेण्यास ईच्छुक असणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकता. त्याच बरोबर १२वी विज्ञान उत्तीर्ण, आयटीआय झाली व आणि एमसीव्हीसी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात. यासाठीसुद्धा महाविद्यालयामध्ये सुविधा केंद्र सुरू झालेले आहे. यापूर्वी आयटीआयमध्ये ज्या ट्रेडचे शिक्षण घेतले जात होते, त्याच ट्रेडशी संबंधीत शाखेतच विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश दिला जात होता मात्र यंदाच्या वर्षांपासून ट्रेडच्या या बंधनातून आयटीआय झालेल्या विद्यार्थीना मुक्तता मिळाली आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा बहुतांश आयटीआय झालेल्या विद्यार्थीना होईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल नागवडे यांनी दिली.तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी