देशमुख वाडी पडवी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
By : Polticalface Team ,Thu Jun 16 2022 23:03:15 GMT+0530 (India Standard Time)
दौंड:
दिनांक 15 जून 2000 22 रोजी दौंड तालुका पडवी देशमुख वाडी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व लोककल्याण आधार मंचाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद शितोळे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रवींद्र शितोळे, रोहित गायकवाड ज्येष्ठ मार्गदर्शक उदयसिंग दादा शितोळे, किरण गायकवाड, पालक वर्ग व महिला पालक मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित होते, यावेळी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले मुलांना शाळेची कपडे व पुस्तके वाटप करण्यात आले श्री उदयसिंग दादा शितोळे, ग्रामपंचायत प्रमोद शितोळे सदस्य शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रवींद्र शितोळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री विश्वासराव शितोळे यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले शाळेचा वार्षिक आराखडा सर्वानुमते तयार करण्यात आला शाळेतील मुलांची पटसंख्या पहिल्याच दिवशी चांगल्या प्रमाणे होती व शाळेत शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन श्री राजेंद्र शितोळे यांनी केले
वाचक क्रमांक :