धक्कादायक घटना, डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली

By : Polticalface Team ,Mon Jun 20 2022 18:38:31 GMT+0530 (India Standard Time)

धक्कादायक घटना, डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली सांगली : महाराष्ट्रातील सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डॉक्टर कुटुंबातील 9 जणांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आत्महत्या केली. या सर्वांनी दोन वेगवेगळ्या घरात विष पिऊन मृत्यूला कवटाळले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोमवारी सांगलीतील अंबिका नगर आणि राजधानी कॉर्नर येथील घरातून पोलिसांना नऊ जणांचे मृतदेह सापडले. डॉक्टर दाम्पत्याच्या एका घरातून सहा आणि दुसऱ्या घरातून तीन मृतदेह सापडले आहेत. एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातील सर्वजण हळहळले.

कर्जाच्या ओझ्याला कंटाळून सर्वांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. डॉक्टर कुटुंब कर्जाच्या सापळ्यात चांगलेच अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

सोमवारी सकाळी डॉक्टर दाम्पत्याच्या घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी घराजवळ पोहोचून दरवाजा उघडून पाहिले. शेजाऱ्यांना घरामध्ये 6 मृतदेह दिसले, त्यानंतर 3 मृतदेह दुसऱ्या घरातही सापडले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. अधिका-यांनी तपास केला असता, सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे दिसते. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी