By : Polticalface Team ,Mon Jun 20 2022 21:28:18 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या एच एस सी मार्च 2022 या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थिनी कुमारी जौंजाळ वैष्णवी शंकर ७५.५० टक्के, तर द्वितीय क्रमांक कुमारी काकडे किरण गणेश ७०.५० टक्के, तसेच तृतीय क्रमांक कुमारी सोनवणे राधिका दत्तात्रय ६९.६७ या एच एस सी च्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुणानुक्रम मिळवल्याबद्दल तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल तसेच बाळासाहेब जठार यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल विद्यालयाच्यावतीने यथोचित सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय सस्ते हे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा धर्मनाथ काकडे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय गाठण्यासाठी सतत अभ्यासात मग्न होणे गरजेचे आहे,. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये लातूर पॅटर्न राबवला जात आहे. त्यातून अनेक विद्यार्थ्यांना भविष्यासाठी संधी प्राप्त होत आहे असे सांगून श्री काकडे पुढे म्हणाले की, महाविद्यालयातअनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना सतत योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उच्च पदावर जाऊन पोहोचले आहेत .त्यामुळे निश्चितच श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांची देखील सर्वांगीण प्रगती होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणानंतर योग्य करिअर निवडावे व आपले ध्येय निश्चित करावे असे आवाहन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा धर्मनाथ काकडे यांनी यावेळी केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक बाळासाहेब जठार यावेळी म्हणाले की, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेताना जिद्द व चिकाटी अंगी बाळगावी. त्यातून विद्यार्थी निश्चितच आपले ध्येय पूर्ण करू शकतो. असे सांगून शिक्षण संस्थेने मला मुख्याध्यापकपदी संस्थेमध्ये पदोन्नती देऊन जी जबाबदारी सोपवली ते निश्चितपणे यशस्वी रित्या विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू. विद्यालयाने सत्कार आयोजित केल्याबद्दल श्री जठार यांनी संस्था व विद्यालयाचे आभार मानले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी उच्च माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांनी एच एस सी च्या परीक्षेत उत्तम प्रकारे गुण प्राप्त केले, तसेच प्रा धर्मनाथ काकडे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अध्यापन करत असताना पीएचडी प्राप्त केली तसेच बाळासाहेब जठार यांनी शिक्षक पर्यवेक्षक या पदावर उत्कृष्टपणे काम करून मुख्याध्यापक पदापर्यंत काम करण्याची संधी त्यांना मिळाली त्याबद्दल या सर्व सत्कार मूर्तींच्या कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमास उच्च माध्यमिकचे प्रा सचिन लगड, प्रा निसार शेख, प्रा पुष्पलता पाचपुते, विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले. आभार प्रा सचिन लगड यांनी मानले. वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष