पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु
By : Polticalface Team ,Tue Jun 21 2022 16:16:49 GMT+0530 (India Standard Time)
जाहीर झालेल्या दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने पुढील प्रवेशासाठी आणि करिअर करण्यासाठी योग्य दिशा मिळाली. सोनिया गांधी पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविण्यासाठी दि. ०२ जून पासून असलेल्या गर्दीत आज अधिक भर पडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलीटेक्निक, संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.११६४) ला मान्यता मिळाली आहे. दि.०२ जून २०२२ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी संबंधित प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया गुरुवार, दि. ३० जून २०२२ पर्यंत चालणार आहे. प्रवेश केंद्रावर अधिक गर्दी होऊ नये या हेतूने दहावीच्या निकालापूर्वीच डिप्लोमा प्रवेशाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येत होता. त्यात काल गुणपत्रिका देखील ऑनलाईन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. सन २०२२-२३ करीता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून एस. जी. पी. पॉलिटेक्निकला मान्यता दिली आहे. श्रीगोंदा पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे एस.जी. पी. तंत्रनिकेतनचे १२ वे वर्ष असून या महाविद्यालयाने स्थापनेपासूनच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सोनिया गांधी पॉलीटेक्निक चे संस्थापक सचिव,श्री राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य अमोल नागवडे यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकाल, आदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे या तंत्रनिकेतन जि पंचक्रोशी मध्ये कायम चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरलेले सोनिया गांधी पॉलिटेक्निक बनले आहे. त्यामुळे येथे प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत आहे. रजिस्ट्रेशनची ही प्रकिया दि.३० जून २०२२ (सायं ५:००) पर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा.’ असे आवाहन देखील प्राचार्य अमोल नागवडे यांनी केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर दि.०३ जुलै २०२२ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.पी.एन. गायकवाड (मोबा.क्र. ९८९०५६६२८१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सन २०२२-२३ करीता प्रवेशासाठी सोनिया गांधी पॉलीटेक्निक, संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.