छत्रपती शिवाजी कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड! हैद्राबाद येथे कॅम्पस मुलाखतींचे आयोजन..
By : Polticalface Team ,Tue Jun 21 2022 16:27:35 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील एम.एस्सी (रसायनशास्त्र) भाग-२ या वर्गातील २ विद्यार्थी आणि २ माजी विद्यार्थिनी अशा एकूण ४ विद्यार्थ्यांची हैद्राबाद येथील नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली.
सोमवार दिनांक २० जून २०२२ रोजी हैद्राबाद येथे प्लेसमेंट सेल मार्फत छत्रपती शिवाजी कॉलेज आणि "क्लिअरसिंथ लिमिटेड" यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. या नामांकीत औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीत,रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागातील जागांकरिता लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. एकूण ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेल विभागातील प्रा.विलास सुद्रिक यांनी विशेष मेहनत घेतली तर इतर सदस्य प्रा.विजय इथापे आणि प्रा. प्रविण नागवडे यांनी खंबीर साथ दिली.
फक्त डिग्री देण्यापुरती ही संस्था नसून विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळवून देणारी ही अमृतवाहिनी झाली पाहिजे, या स्व.बापूंच्या विचाराने प्रेरित होऊन आदरणीय राजेंद्र दादा आणि विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम सुरू आहेत. कॉलेजचा प्लेसमेंट विभाग २० पेक्षा जास्त कंपनी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. म्हणूनच २०२१-२२ या एकाच शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखतीमधून ६० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत, पुढेही हीच परंपरा कायम राहणार असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य दातीर ,अनिल भोळे, धनश्री नागवडे आणि योगिता पोकळे यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ, रसायनशास्त्र विभागप्रमुख व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी