टाकळी कडे सोसायटी च्या चेरमन पदी विठ्ठल वाळुंज तर व्हा चेरमन पदी कांचन नवले
By : Polticalface Team ,Thu Jun 23 2022 18:54:57 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे सोसायटी च्या चेरमन पदी विठ्ठल वाळुंज तर व्हा चेरमन पदी कांचन नवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीनंतर कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडून गुलाल उधळण जल्लोष साजरा केला
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली त्यामध्ये बाबासाहेब इथापे यांच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत ऍड अशोक वाळुंज व सतीश नवले यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या किसान क्रांती परिवर्तन पॅनल चे तब्बल ८ उमेदवार विजयी झाले तर काहींचा निसटता पराभव झाला होता त्यानंतर आज दि २३ रोजी सहाय्यक निबंधक यांचेकडून चेरमन व्हा चेरमन निवडीची तारीख देण्यात आली होती त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी चेरमन पदासाठी विठ्ठल वाळुंज व व्हाइस चेरमन पदासाठी कांचन नवले यांचे अर्ज दाखल झाले परंतु समोरून कोणीही अर्ज दाखल न केल्याने चेरमन पदासाठी विठ्ठल वाळुंज व व्हाइस चेरमन पदासाठी कांचन नवले
या दोन्ही उमेदवारांना बिनविरोध घोषित करण्यात आले त्यावेळी कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला
वाचक क्रमांक :