घरफोडी करणारी अट्टल महीला,श्रीगोंदा पोलीसांचे जाळ्यात.

By : Polticalface Team ,Sun Jun 26 2022 20:18:59 GMT+0530 (India Standard Time)

घरफोडी करणारी अट्टल महीला,श्रीगोंदा पोलीसांचे जाळ्यात. श्रीगोंदा: दि.30/03/2022 रोजी फिर्यादी अॅड.सुरेंद्र सोनाजी काळोखे रा.पंतनगर,श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली की,पंतनगर येथिल राहते घराचे दरवाजाची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादीचे सोन्याचे दागिने व चांदीचे पैंजन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि नं.218/2022 भा.द.वि.क 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास चालु असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा राणी महादेव भोसले रा.वडाळी रोड,गजानन नगर,श्रीगोंदा ता.श्रीगोंदा हीने केला आहे. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर महीला आरोपीस ताब्यात घेण्यास सांगितले.सदर महीला हीस सी.सी.टी.व्ही फुटेज व गुप्त बातमी मिळाल्यावरून दि . 22/06/2022 रोजी श्रीगोंदा येथून ताब्यात घेतले.महीला आरोपीकडे वरील गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली . आरोपीकडे कसुन चौकशी केली असता वरील घरफोडी केल्याची कबुली दिली.महीला आरोपीकडुन गुन्ह्यात चोरीस केलेला मुद्देमाल 1,00,000 / -रु.( एक लाख रुपये ) किंचा त्यात सोन्याचे दागीने गंठण 15 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने 75 ग्रॅम वजनाचे व 25,000 /- रु . किंची.गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची अॅक्टीवा गाडी तिचा आर.टी.ओ.नं.एम.एच.16 वाय 7275 असा हस्तगत करण्यात आले आहे.1) आरोपी राणी महादेव भोसले वय 35 वर्षे रा.देवकर बिल्डिंग समोर राजीव गांधीनगर,गल्ली नं .05 पिंपळे गुरव पुणे ह.रा. वडाळी रोड,गजानन नगर, श्रीगोंदा ता.श्रीगोंदा याचेवर पुर्वी दाखल असणारे गुन्हे 1 ) सांगवी पोलीस स्टेशन पुणे शहर गु . रजि. नं. 17/2022 भा.द.वि.क.457,380 ( 2 ) श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 218/2022 भा.द.वि.क .454,457,380 सदर महीला आरोपी ही सराईत गुन्हेगार असुन सध्या पोलीस कस्टडी मध्ये असुन तिचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदर महीला आरोपींकडुन 1,00,000 / - रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन घरफोडीचा 01 गुन्हा उघडकीस आला आहे . सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब,मा.अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले पोसई समीर अभंग, सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ,प्रकाश मांडगे,बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके,पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी