अवैद्य माल वाहतूक करणार्यावर बारामती प्रादेशिक विभागाची कारवाई
By : Polticalface Team ,Tue Jun 28 2022 12:01:58 GMT+0530 (India Standard Time)
अमोल गायकवाड -वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील अवैद्य माल वाहतूक करणार्यावर बारामती प्रादेशिक विभागाने कारवाई केली आहे. वडगाव निंबाळकर येथे टाटा मॅजिक या मालवाहतूक करणाऱ्यावर बारामती प्रादेशिक विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रतिक मोहिते यांनी वडगाव निंबाळकर येथे कारवाई केली आहे.
निरा-बारामती या रस्त्यावर ती बरेच वाहने हे अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करीत असतात. त्यावर देखील कारवाई होण्याची मागणी वडगाव निंबाळकर आणि परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या मार्गावरती संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांची पालखी मार्गस्थ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली असल्याचे बोलले जात आहे. वडगाव निंबाळकर येथील होळ चौकांमध्ये अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप वारंवार त्या ठिकाणी थांबलेले असतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र निदर्शनात येत आहे. त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. वडगाव निंबाळकरच्या परिसरामधील अवैद्य मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे यांच्यावर ही कारवाई करण्याची मागणी बारामती तालुका बहुजन हक्क परिषदेने केले आहे.
वाचक क्रमांक :