शेतकऱ्याच्या घरची प्रेमाची भाकर आणि शिवारातील ते भोजन याची सर इतर कशालाही येणार नाही - छत्रपती संभाजीराजे भोसले
By : Polticalface Team ,Wed Jun 29 2022 19:58:30 GMT+0530 (India Standard Time)
बिड जिल्हा प्रतिनिधी
बाळराजे जाधव:
तलवाडा कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले हे मराठवाडा दौऱ्यावर आले असताना ; गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांचे बळीराजाच्या वतीने स्वागत करण्यात आले . छत्रपतींच्या हस्ते श्री त्वरिता देवी मातेच्या मंदिरात दर्शन घेवून देवीची महाआरती करण्यात आली . तसेच तलवाडा येथे खरीप हंगामाच्या पेरणीचा स्वतः तिफन चालून शुभारंभ केला . तसेच तलवाडा येथील शिवा हजारे या शेतकऱ्याच्या घरची प्रेमाची भाकर आणि शिवारातील खर्डा भोजनाचा आस्वाद ही त्यांनी घेतला . छत्रपती शिवाजी चौकात पुष्पहार अर्पण करून ; तलवाडा येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व आंबेडकर चौकात मुस्लिम समाज तर्फे खिजर शेख यांनी राजेंचा सत्कार देखील केला महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी तलवाडा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भेट दिली . छत्रपती संभाजी महाराज चौकात त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले . तसेच साठे चौकात ही भेट देण्यात आली . नियोजित वेळेपेक्षा थोडासा उशीर झाला असताना देखील तलवाडा येथील जनतेचा उत्साह तिळमात्र देखील कमी झाला नाही . कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सर्वात तरुण पंचायत समिती सदस्य , प्रदेशाध्यक्षा पुजा ताई मोरे व त्यांचे सहकारी बाळासाहेब शिनगारे , शेख खिजर , रमेश नाटकर , जयदेव शिंगाणे व हिंगणगाव येथिल आत्महत्या ग्रस्थ नामदेव जाधव यांचे भाऊ बाळराजे जाधव व मुलगा आदित्य जाधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक :