पाऊस पुन्हा सर्व दूर खरीप हंगामाच्या पेरणीला वेग श्रीगोंदा तालुक्यातील पाणीटंचाईची व्यथा

By : Polticalface Team ,Sat Jul 02 2022 16:07:24 GMT+0530 (India Standard Time)

पाऊस पुन्हा सर्व दूर खरीप हंगामाच्या पेरणीला वेग श्रीगोंदा तालुक्यातील पाणीटंचाईची व्यथा लिंपणगाव (प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्यात पाऊस तूर्ता थांबला गेला आहे. पाऊस थांबल्यामुळे खरीप हंगामाचे पेरणीला मोठा वेग आला आहे. जमिनीत वापसा तयार झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके अनुक्रमे कपाशी, बाजरी ,मूग, उडीद इत्यादींची लागवडी व पेरणीला मोठा वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. यंदा रोहिणी व मृग नक्षत्राने पाठ फिरवली, मात्र आदरा नक्षत्राने तालुक्यात सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा विषयी अपेक्षा वाढल्या आहेत. आता गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीमध्ये मग्न झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन खरीप हंगामाच्या उत्कृष्ट बियाण्यांची खरेदी करण्यासाठी दिसत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालू वर्षी पावसात जोर नसला तरी शेतकरी मात्र खरीप हंगामाचे पेरणीसाठी तयार नाहीत त्यामुळे कमी अधिक ओलीवर खरीप हंगामाच्या पेरण्या जोमात सुरू आहेत. श्रीगोंदा तालुक्यात जवळपास 45 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद सांगितले जाते. परंतु पाणी पातळीत मात्र वाढ झाली नसल्याचे देखील शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीला दिवसभर कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाची तीव्रता तर उकड्याचे हे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशा या दिवसभर बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिकाची मोठी चिंता लागून आहे. आता गेल्या दोन दिवसापासून वाऱ्याचा प्रवाह वेगाने वाढताना दिसतो. त्यामुळे हे वारे पावसाचा अंदाज सांगतात की? पाऊस नाही म्हणून सांगतात. याबाबतही शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला विहिरी व कुपनलिकाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. दिवसभर बदलणाऱ्या वातावरणामुळे आहे, त्या पाण्याची देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होताना दिसते. त्यामुळे खरीप हंगामाच्या पिकांचे भवितव्य अंधकारमय आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमी अधिक ओलीवर खरीप हंगामाच्या पेरण्या केल्या. आता काही दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर पेरणी केलेला खरिपाचा हंगाम धोक्यात येऊ शकतो. असा देखील तर्क शेतकऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महेिने उलटल परंतु पावसात जोर नसल्याने श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागांमध्ये पाणीटंचाई कायम दिसून येते. त्यामध्ये रोहिणी व मृग नक्षत्र हे मोठ्या पावसाचे नक्षत्र समजले जाते. परंतु या दोन्ही नक्षत्रांमध्ये पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्याने पुढे देखील पावसाचे भवितव्य कसे असेल याविषयी शेतकऱ्यांमधून तर्क व्यक्त केला जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष