करमाळ्यात मुस्लिम समाज व भारत रत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम आझाद फाऊंडेशन च्या वतीने वारकरी ना बिस्कीट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By : Polticalface Team ,Mon Jul 04 2022 15:21:07 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा: प्रतिनिधि
करमाळा शहरातील पोथरे रोड वर आषाढी एकादशी ला जाणारे वारकरी ना मुस्लिम समाज व भारत रत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम फौडेशन यांच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता बिस्कीट पुढे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी युवा नेते अमीरशेठ तांबोळी करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार भारत रत्न डाॅ ए पी जे अब्दुल कलाम आझाद फाऊंडेशन चे संस्थापक समीर शेख मुस्लिम विकास परिषद चे अध्यक्ष फारूक बेग जामा मस्जिद चे जमीर सय्यद सामाजिक कार्यकर्ते सुरज शेख बहुजन विकास संस्था करमाळा चे अध्यक्ष इसाक पठाण अकबर बेग अकील शेख. आयान बेग पिंटुशेठ बेग राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख जिशान कबीर मोहसीन पठाण खलीलभाई मुलाणी जहाॅगीर बेग आलीम शेख इत्यादी जणानी दिंडी चे स्वागत करून त्यांना बिस्किटे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले
मुस्लिम समाज व भारत रत्न डाॅ ए.पी.जे.अब्दुल कलाम फौडेशन करमाळा यांचे वतीने दरवर्षी पंढरपूर येथे जाणारे वारकरी ना फळे पाणी बाटली. बिस्किटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते त्यांच्या या उपक्रमाचे शहरात सर्व हिंदु मुस्लिमांनी स्वागत केले आहे
वाचक क्रमांक :