By : Polticalface Team ,Wed Jul 06 2022 13:18:11 GMT+0530 (India Standard Time)
मुबई:
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.... असं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
विधानसभेत 164 मते मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी सोमवारी विधानसभेत केलेलं भाषण चांगलच गाजलय.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना? असा टोला शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला होता.
त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे, कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले .
वाचक क्रमांक :