श्रीगोंदा तालुक्यात दोन कुटुंबाच्या वादात कोयता , कुऱ्हाडी सारख्या धारदार शस्त्राचा वापर

By : Polticalface Team ,Fri Jul 08 2022 18:56:58 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्यात दोन कुटुंबाच्या वादात कोयता , कुऱ्हाडी सारख्या धारदार शस्त्राचा वापर शेतातील पावसाचे पाणी जाण्याचे किरकोळ कारणावरून तालुक्यातील पिसोरा खांड येथील रहिवासी असलेल्या दोन कुटुंबात सतत वाद होत होता. दिनांक 7 जुलै 2022 रोजी सकाळी 10:15 चे सुमारास घनश्याम इंगळे यांना घरी असताना, पुरुषोत्तम इंगळे यांच्या घरच्यांनी पावसाचे पाणी बंद का करत नाही.? म्हणत, त्यांच्यात शेतात जाणाऱ्या पाण्यावरून वाद झाला. पुरुषोत्तम इंगळे यांनी घनश्याम इंगळे यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करत, ऊस तोडण्याच्या कोयत्याने दरवाजावर वार करत दहशत निर्माण केली. यावेळी सुदाम इंगळे हे पुरुषोत्तम इंगळे यांना आडवन्यासाठी गेले असता, त्यांनीही सुदामवर कोयता उगारून लाथा बुक्क्यांनी मारहान केली व महिलांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. दोघात झालेल्या वादाच्या तक्रारी देण्यास ते दोघे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर 11:45 चे दरम्यान मागे घरी त्रिंबक इंगळे व कुटुंबीय घरात असताना पुरुषोत्तम इंगळे व प्रशांत इंगळे असे दोघे त्यांच्या घरात आले. यावेळी प्रशांत इंगळे यांच्या हातात कुऱ्हाड होती. किरकोळ पावसाच्या पाण्यावरून इंगळे कुटुंबात झालेल्या वादातून शस्त्र दाखवत एकमेकांना अश्लील शिवीगाळ व मारहाण करत, जीवे मारन्याची धमकी दिली. म्हणून, फिर्यादी रेश्मा इंगळे यांनी चुलत सासरे पुरुषोत्तम इंगळे, चुलत सासू तसेच दीर प्रशांत इंगळे राहणार पिसारा खांड यांच्या विरोध नमूद प्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादवी कलम 452, 323, 504, 506, 34, 427 व भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्त्रोत:(फिर्याद)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी