शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना मोठा झटका , अटक वॉरंट जारी
By : Polticalface Team ,Fri Jul 08 2022 19:23:31 GMT+0530 (India Standard Time)
मुंबईः शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर
संजय राऊत यांना अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टामध्ये अब्रुनुकसानीची तक्रार केली होती. आता संजय राऊत यांना या प्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
सध्या शिवसेनेत सर्व काही अलबेल दिसत नाही, कारण शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. तर आता शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक वॉरंट निघल्याने त्यांच्या अडचणीत देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे
वाचक क्रमांक :