By : Polticalface Team ,Sat Jul 09 2022 16:43:24 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा : तालुक्यांतील राजकियदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चोराचीवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलच्या पुष्पा बाळासाहेब साळुंखे यांची चेरमन पदी व भिमराव लांडगे यांची व्हा चेरमन पदी बिनविरोध निवडी करण्यात आली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलच्या 12/1 आशा एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या सर्व बिनिरोध निवडून आलेले संचालकांचे चोराचीवडी चे सरपंच,चेरमन यांनी अभिंदन केले. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता गावाच्या विकासाचा दृष्टीने येथिल सेवा सहकारी सोसायटीची निवड बिनविरोध केल्याले चोराचीवाडी गावातली सर्व सभासदांनी व ग्रामस्थांनी संचालकांचे अभिनंदन केले. चेरमन व व्हा चेरमन यांनी आपण सोसायटीचा विकासासाठी व सभासदांना कसा जास्तीत जास्त फायदा सोसायटीच्या मार्फत मिळून देता येईल या साठी प्रयत्न करणार असे बोलताना सांगितले व सर्व सभासद व ग्रामस्थ चोरचीवडी यांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :