By : Polticalface Team ,Sat Jul 09 2022 16:45:46 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी । श्रीगोंदे नगर - दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे आमदार बबनराव पाचपुते यांच्या निधीतून बनवलेले बसथांबा अज्ञात इसमांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने दोन तीन दिवसांपूर्वी एका रात्रीत जमीनदोस्त केले. हे बसस्थानक राजकीय पार्भूमी असणाऱ्या एका कार्यकर्त्यांच्या हॉटेलला अडचण होत असल्याने ते पाडल्याची चर्चा असून या बाबत प्रशासन काय भूमिका घेणार ? कारवाई होणार की नाही या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले. आमदार बबनराव पाचपुते यांच्या निधीतून नगर- दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे प्रवाश्यांच्या सोईसाठी बसस्थानकाची उभारणी केली होती . हे बसस्थानक तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी जेसीबी पारगाव फाटा येथील बसथांबा अज्ञात इसमांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने एका रात्रीत जमीनदोस्त केला. मशीनच्या सहाय्याने एका रात्रीत जमीनदोस्त केले. हे बसस्थानक परिसरातील एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्याच्या हॉटेलला अडथळा येत असल्याने त्याने ते जमीन दोस्त केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून हॉटेल मालक लवकरच हॉटेलला अडचण बसस्थानकाशेजारील ठरणाऱ्या विस्तृत अश्या वडाच्या झाडावर देखील कुऱ्हाड चालवणार असल्याची माहिती समजते. याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार ? हॉटेल मालक भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा जवळचा कार्यकर्ता असल्याने कारवाई होणार की नाही या बाबत अनेक मते मतांतर परीसरात होत आहे .
वाचक क्रमांक :