By : Polticalface Team ,Sat Jul 09 2022 16:54:28 GMT+0530 (India Standard Time)
नमूद मागासवर्गीय मुलाची मुंडन केलेली अर्धनग्न अवस्थेतील Video clip सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पुरोगामी संघटनांच्या राज्य पदाधिकाऱ्यांचे पो नि दुधाळ यांना फोन येऊ लागले. अनेकांनी घटनेबाबत विचारणा केली.. तर, त्यांनी उडवाउडविची उत्तरं दिलेत.. अनेक गोष्टी त्यांनी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे...! घटना घडली नाही..कोणाची तक्रार नाही.. असे दुधाळ साहेबांचे म्हणने आहे. यातच.. घडलेल्या निर्दयी घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी घडलेला निंदनीय प्रकार माध्यमांना सांगितला आहे..
त्यांनी सांगितले की, दिनांक 5 जुलै 2022 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 वाजण्याच्या सुमारास चर्मकार समाजाची दोन मुलं व मातंग समाजाचा एक मुलगा असे मोटरसायकलवर गावात फिरत होते. येथीलच एका महिलेने त्यांना का फिरता..? म्हणून विचारणा केली व बडबड केली. वाडीतील मुलींच्या मागे फिरता काय..? असा संशय त्या मुलांवर घेण्यात आला होता.
दुपारी 1:00 ते 1:30 वाजण्याचा दरम्यान नमूद महिलेच्या सांगण्यावरून सदरील मुलांना काही लोकांनी पकडून दौंड नगर महामार्गा वरील कोळगांव फाटा येथे आनले... त्यांच्यावर दडपशाही करण्यात आली... त्यातील चर्मकार समाजाच्या एका मुलाला गर्दीत पुढे घेऊन, त्याच्या अंगातील कपडे काढण्यात आले.. अर्णनग्न अवस्थेत त्याचे टक्कल करण्यात आले... त्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली... जमावातील 7 ते 8 लोकं त्याला हान मारत होते. यावेळी साधारण 300 ते 350 लोकांचा जमाव घटनास्थळी जमला होता.
घटनेची परिस्थिती लक्षात घेता, मुंडन केलेल्या मुलाच्या भावाने बेलवंडी पोलीस स्टेशनला फोन केला. बेलवंडी पोलीस ठाण्यातून एक पोलीस व्हॅन घटनास्थळी दाखल झाली.. ज्यात 2 पोलीस कॉन्स्टेबल व 1 महिला पोलीस कर्मचारी होती. पोलीसांनी जमावं पांगवला व मुलांना ताब्यात घेतले, अंन पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी नमूद मुलांना झालेला प्रकार विचारला.. त्यांनी आमचा छेडाछडीत काही संबंध नाही.. असे सांगितले.. टवळखोरांचे नाव सांग..? अशी विचारपूस पोलीस निरीक्षक यांनी केली. 4:30 वाजेपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.. मुलांना त्या ठिकाणी बसवून ठेवण्यात आले होते. रात्री 9:30 वाजता त्या मुलांना सोडलं.. त्यावेळी मोटरसायकल वरून कोळगांव मध्ये त्यांचे घरची लोक त्यांना घेऊन आले.
दिनांक 6 जुलै 2022 सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमारास चर्मकार समाजाच्या मुलांचा दोस्त नाभिक समाजाचा मुलगा सलून मध्ये काम करत असताना काही जणांनी त्याला पकडून पुन्हा कोळगाव फाटा या ठिकाणी नेले.. त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. यावेळी चर्मकार समाजाचे ते दोन्ही मुलं घटनास्थळी आणण्यात आली. तसेच, मातंग समाजाचीही दोन मुलं त्या ठिकाणी पकडून आणण्यात आली. 11:00 वाजण्याच्या दरम्यान या सर्वांना पुन्हा मारहाण करण्यात आली. पुन्हा सर्वांची पायी धिंड काढत माऊली मंदिराकडे नेण्यात आले.. दरम्यान जाताना दुकानांची शटर बंद करून, त्यांना आत मारहाण करण्यात आली.. उपस्थितांना मोबाईलवर शूटिंग करण्यास मज्जाव केला.
मातंग समाजाचे दोन मुलं पकडून कोळगांव बस थांब्यावर सोडण्यात आली व चर्मकार समाजाच्या मुंडण केलेल्या मुलाला पुन्हा जमावाने फिरवत येथील एका शाळेत नेले. दरम्यान घडलेल्या घटनेबाबतची बातमी सामाजिक माध्यमांत फिरत होती. 5 जुलै ची घडलेली गंभीर घटना त्यात वर्तवण्यात आली होती. त्याचा अनेकांना रोष होता. बातमीदारांना माहिती कोणी दिली..? या बाबत विचारण्यात आले व पुन्हा दम देऊन घरच्यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.
दिनांक 8 जुलै 2022 बातमी व व्हिडिओ क्लिप च्या आधारे स्थानिक प्रशासनास सामाजिक संघटनांचे पदाधिकारी विचारपूस करू लागले.. या घटनेला आता वेगळे वळण लागणार..! याचा अंदाज आल्याने.. घटनाच दडपून टाकण्याचा प्रकार दुष्कृत्य करणारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनी ठरवला.. स्थानिक पोलिसांना बोलवून मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी घडलेला सदर प्रकार जर कोणाला सांगितला..? तर..! तुम्हाला गावात राहू देणार नाही.. असा दम पिडीतांना दिला. यावरून भेदरलेल्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला तसा जबाब नोंदवला. आमच्यासोबत कसलाही प्रकार घडलेला नाही.. आमची कसलीही तक्रार नाही.. आमचं सर्व मिटल आहे.. माध्यमांत आलेल्या बातम्या खोट्या आहेत.!! असं काही घडलच नाही..
सदरील घटना गंभीर असून, याबाबत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करा.. अन्यथा, राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तर, भाई जाधव यांनी या अत्याचाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आज श्रीगोंदा तालुका तसेच, परिसरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र येत, नमूद घटनेबाबत समीक्षण बैठक घेणार आहेत. वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष