By : Polticalface Team ,Sat Jul 09 2022 21:08:29 GMT+0530 (India Standard Time)
सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ.संगिता ढगे यांनी पाहिले. घटनेची थोडक्यात हकीगत अशी की , "फिर्यादीची बहिण नामे नेहा हिचे मुळ गाव पोथरे ता. करमाळा जि सोलापुर असे होते व ती एकटीच मुळ गावी राहत असताना तिची आरोपी शंकर किशोर साळवे याच्याशी ओळख झाली. त्यांनतर त्यांचे प्रेमात रूपांतर झाले. मयत नेहा हिचे वय त्यावेळी 17 वर्षे होते. तेंव्हा आरोपी शंकर साळवे याने तिचे बरोबर लग्न करण्याचे ठरविले होते . पंरतू वय कमी असल्याने फिर्यादी हिने आरोपी व मयत नेहा हिस सांगितले की, ती सज्ञान होई पर्यंत थांबा. परंतु, आरोपी त्यावेळी फिर्यादीस म्हणाला की, तुम्ही जर आमचे लग्न लावून दिले नाही तर मी नेहाला पळवून घेवून जाईल.
त्यामुळे फिर्यादीने तिची बहिण नेहा हिने भविष्यात कोणताही अनुचित प्रकार करू नये म्हणून , नेहाचे लग्न दिनांक 17 जून 2020 रोजी आरोपी शंकर साळवे याचेसोबत मिरजगाव येथे नाईलाजाने लावून दिले होते. लग्नानंतर मयत नेहा ही तिचे सासरी मिरजगाव येथे नांदण्यास आली असता, तिचे घरात तिचा सासरे किशोर व पती शंकर असे राहत होते.
मयत नेहा हिने फिर्यादीस फोनवर सांगितले की शंकर व त्याचे वडील यांच्या दोघात काही कारणामुळे वाद झाला. त्यामुळे आरोपी शंकर व त्याचे वडिल हे वेगवेगळे राहत होते. मयत नेहा व तिचा पती शंकर हे दोघे घटनेच्या दोन दिवसापूर्वी फिर्यादीचे गावी नवसारी, गुजरात येथे आले होते. दिनांक 7 मार्च 2021 रोजी फिर्यादी मयत नेहा व आरोपी शंकर साळवे, मयत नेहाचा भाऊ ज्ञानेश्वर, फिर्यादीची मुलगी असे सर्व टैम्पोमध्ये मिरजगाव येथे जाण्यासाठी आले होते.
दिनांक 8 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजणेच्या सुमारास ते सर्व मिरजगाव येथे आले. घरी मिरजगाव येथे आल्यानंतर बहिण नेहा हिने स्वयंपाक केला व नंतर दुपारी 2:00 वाजणेच्या सुमारास सर्व जेवन करण्यासाठी घरात बसले होते. फिर्यादी त्यांचे घरासमोर कपडे धुत होती. फिर्यादीस अचानक मोठ्याने ओरडण्याचा आवाज आल्याने ती घरात गेली असता, मयत नेहा व आरोपी शंकर यांच्यात कडाक्याचे भांडण चालू होते. आरोपी शंकर हा मयत नेहाला घाण घाण शिवीगाळ करत होता, आरोपीने मयत नेहा हिला फिर्यादी समोरच तिच्या तोंडावर जोरात बुक्की मारली व तिला खाली पाडून जोर - जोरात लाथा - बुक्यांनी कमरेच्या बेल्टने मारहाण केली. तसेच तिला गळयाला व केसाला धरून तिचे डोके घरातील भिंतीवर आपटले.
त्यावेळी मयत नेहा ही आरोपीस म्हणत होती की, तु माझे वाटोळे केले, तुझे लफडे आहे. त्यावेळी आरोपीने पत्नी नेहाला घराबाहेर काढले. परंतु , पत्नी नेहा ही मी येथेच घरात राहणार आहे असे म्हणत होती. घरातील गोंधळ वाढल्याने आरोपीच्या घराचे पाठीमागेरा राहत असलेले आरोपीचे वडील तेथे पळत आले . त्यांनीही आरोपीला भांडणे करू नका असे समजावून सांगितले .
परंतु आरोपी हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता व तो पत्नी नेहाला लाथा - बुक्याने व बेल्टने मारत होता. परंतू त्याला समजावून सांगवून देखील तो कोणाचे ऐकत नव्हता. मयताचे भावाला हे पाहवत नसल्याने शेवटी फिर्यादी व मयताचा भाउ ज्ञानेश्वर असे दोघेजण तेथून पाथरे करमाळा येथे आज्जीकडे जाण्यासाठी निघाले. ते मिरजगाव येथील बस स्टॅण्डवर आले असता, वाटेतच चापडगाव जवळ असताना, दुपारी 4:00 वाजणेच्या सुमारास आरोपी शंकर साळवे याने त्याच्या मोबाईलवर मयताचा भाउ ज्ञानेश्वर यास फोनवरून सांगितले की , बहिण नेहा हिने घरात फाशी घेतली आहे व मी तिला घेवून मिरजगाव येथील दवाखान्यात घेवून आलो आहे व ती माझ्याशी बोलत नाही तुम्ही लवकर या असे सांगितले.
त्यामुळे लगेचच फिर्यादी व तिचा भाउ ज्ञानेश्वर मिरजगाव येथील सरकारी दवाखान्यात गेले. त्यावेळी त्यांनी मयत नेहा हिस पाहिले असता, ती एका अॅबुलंन्समध्ये तिचे प्रेत दवाखान्यात टाकले होते. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले नंतर मयत नेहा हिचे बहिणीने तिच्या पतीविरुध्द तिला वर नमूद केल्याप्रमाणे मारहाण करून जिवे ठार मारले म्हणून, कर्जत पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.
त्यावरून कर्जत पोलिस स्टेशनला भा.द.वि. कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपींविरूध्द पो.उप.नि. अमरजित मोरे यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा न्यायाधीश श्री. एम. एस. शेख साहेब यांच्या न्यायालयात झाली.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, वैद्यकिय अधिकारी, तपासी अधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील सौ.संगिता ढगे यांनी पाहिले. मा.न्यायालयासमोर आलेला साक्षी - पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपींना नमूद प्रमाणे शिक्षा सुनावली . पैरवी अधिकारी सौ.आशा खामकर यांनी सहकार्य केले. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष