By : Polticalface Team ,Sun Jul 10 2022 13:20:11 GMT+0530 (India Standard Time)
बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत(वय-२५) असे या त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर त्याच्यावर भा.द.वी. कलम ३५४ विनयभंगाचा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कर्जत पोलिसांनी त्याला जेलची हवा दाखवली आहे. त्यास किमान 2 महिने जेलची हवा खावी लागणार आहे. याअगोदरही त्याने अनेक मुलींना त्रास दिल्याची,जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी,प्राजक्ता (नाव बदललेले ) ही कर्जत येथील एका शाळेत शिकत आहे.ती शिक्षणासाठी रोज घरापासून शाळेपर्यंत एसटी बसने येते. दि.८ रोजी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर ती घराकडे येण्यासाठी बसस्थानकावर येऊन थांबली असता.त्यावेळी बसस्थानकात थांबलेला व त्याच्या अंगात निळा शर्ट व जीन्स पॅन्ट असलेला अनोळखी मुलगा दुचाकी घेऊन (एम.एच १६ सी.एस २६८८) प्राजक्ताच्या जवळ आला व त्याने तिच्याजवळ असलेली दप्तराची बॅग ओढून तिच्या हाताला पकडून चिट्ठी देण्याचा प्रयत्न केला. तू मला आवडतेस, मला फोन कर असे बोलून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.हा प्रकार घडत असताना शेजारी असलेल्या मुलामुलींनी गाडीचे व त्या मुलाचे फोटो काढले होते. सदरचा प्रकार सदर ठिकाणी हजर असलेल्या विद्यार्थिनींनी कर्जत पोलिसांना कळविला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, दीपक कोल्हे, ईश्वर माने यांनी तत्काळ स्थानक गाठले आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना विचारपूस केली त्यावेळी असे लक्षात आले की सदर ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी सदर मुलाचे फोटो व त्याच्या गाडीचे फोटो काढले होते. त्याचा परिसरात शोध घेतला मिळून आला नाही. घरी आल्यानंतर प्राजक्ताने सर्व प्रकार वडिलांना सांगितला.
दरम्यान कर्जत पोलिसांनी मुलाचा व गाडीचा शोध घेतला असता त्याचे नाव बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत असल्याचे समजले.घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने आरोपीला पोलीस अधिकारी अनंत सालगुडे पोलीस जवान गोवर्धन कदम श्याम जाधव सुनील खैरे यांनी तात्काळ अटकही केली आहे.त्यामुळे रोडरोमियो व त्रास देणाऱ्यांसाठी हा मोठा जोर का झटका असल्याचे दिसते.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ आनंद सालगुडे पोलीस जवान गोवर्धन कदम मनोज लातूरकर श्याम जाधव ईश्वर माने दीपक कोल्हे ईश्वर नरोटे आदींनी केली आहे.
अशांची अजिबात गय केली जाणार नाही, असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ कळवा! त्रासाबाबत मुलींनी निर्भयपणे कर्जत पोलिसांना कळवावे. संबंधित तक्रारदाराचे नाव गुप्त ठेऊन कारवाई केली जाते.मुलींची भीती कमी व्हावी यासाठी शाळा महाविद्यालयात अनेक जनजागृती शिबिरे घेतली आहेत.त्यामध्ये मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरीही असे प्रकार घडताना कुणाच्या निदर्शनास आले तर त्रास देणाऱ्याची माहिती तसेच शक्य असल्यास त्याचे व वाहनांचे फोटो पोलिसांना पाठवा. -चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष