भाजपच्या या आमदाराच्या घराबाहेर सापडली सोने , चांदी, व पैशाने भरलेली बॅग
By : Polticalface Team ,Sun Jul 10 2022 16:09:21 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : मुंबईमधील माटुंगा परिसरात राहणारे प्रसाद लाड भाजप आमदार यांच्या घरासमोर पैशांनी भरलेली बॅग सापडल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे कोणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराबाहेर ही बॅग ठेवली होती अशी माहिती समोर येत आहे. मात्र, ही व्यक्ती कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहे.
या प्रकरणावर आमदार लाड प्रतिक्रिया म्हणाले, मला आज सकाळी सुरक्षारक्षकाचा फोन आला. घराच्या बाहेर एक बॅग असल्याची माहिती त्याने मला दिली. त्यानंतर लाड यांनी याबाबत माटुंगा पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली असता. सोने, चांदी, जुन्या चलनाच्या नोटा आणि देवाच्या मूर्ती असा ऐवज बॅगेत सापडला. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली.
मात्र, सदर बॅग कोणी व का ठेवली आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे. आमदारांच्या घराला सुरक्षा असताना अशा प्रकारे बॅग सापडने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे
वाचक क्रमांक :