By : Polticalface Team ,Mon Jul 11 2022 14:06:10 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा : तालुक्यांतील काष्टी येथील नगर अर्बन बँकेची शाखा असलेल्या इमारतीला रात्री भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होता की या आगीमुळे याच इमारतीतील संजय मुनोत, राजेंद्र मुनोत यांच्या दुकानांच्या गोडाऊनचे आगीत मोठे नुकसान झाले.
या इमारती मध्ये असण्याऱ्या नगर अर्बन बँक काष्टी शाखेतील फर्निचर आगीत जळून खाक झाले आहे. लोखंडी कपाटातील कागदपत्रे तसेच व्हॉल्ट मधील वस्तू सुरक्षित असल्याचं सांगितले जात आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नसून आगीत कुठली ही जिवीतहानी झाली नाही. कुरकुंभ, श्रीगोंदा कारखाना, श्रीगोंदा पालिका व शिरूर पालिकेच्या बंबानी रात्री उशिरा आग नियंत्रणात आणली गेली.
वाचक क्रमांक :