काष्टी येथील आगीचा थोडक्यात घटनाक्रम , नगर अर्बन बँक, किराणा मालाचे दुकान व जिम आगीचे भक्षक

By : Polticalface Team ,Mon Jul 11 2022 16:12:18 GMT+0530 (India Standard Time)

काष्टी येथील आगीचा थोडक्यात घटनाक्रम , नगर अर्बन बँक, किराणा मालाचे दुकान व जिम आगीचे भक्षक दिनांक 11/07/2022 रोजी राजेंद्र पोपटलाल मुनोत, वय 52 वर्षे, व्यवसाय किराणा दुकान, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, हल्ली रा. दौन्ड ता. दौन्ड, जि. पुणे यांनी पोलीस स्टेशन येथे खबर दिली की, काष्टी गावात जाणारे रस्त्याचे जय भवानी चौकाजवळ पोपटलाल लालचंद नावाने होलसेल किराणा दुकान आहे. किराणा दुकान असलेली इमारत हि 3 मजली असुन तळघरात किराणा दुकानाचे गोडाउन आहे.

पहिल्या मजल्यावर किराणा दुकाण असुन दुकानाचे वर दुस - या मजल्यावर नगर अर्बन बँक शाखा, तसेच तिस - या मजल्यावर एस.डी. फिटनेस व्यायाम जिम आहे. दिनांक 10/07/2022 रोजी रात्री 08/30 वा. चे सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी दौंड येथे गेलो असता. रात्री 10/30 वा. चे सुमारास घरी असताना, काष्टी येथील बंडु जगताप यांचा फोन आला त्यांनी सांगीतले की, तुमच्या किराणा दुकानाला आग लागली आहे. तुम्ही लकवर या. असा फोन आल्याने लगेच घरुन निघुन 10/45 वा. चे सुमारास काष्टी येथे दुकानाजवळ आलो असता, किराणा दुकान तळघरातील गोडाउन शटर मधुन धुर येत असल्याने किराणा दुकानाचे कुलुप शटर उघडले असता किराणा दुकानाला आतुन पुर्ण आग लागली होती.

त्यांनतर दौंड, कुरकुंभ, श्रीगोंदा कारखाना, श्रीगोंदा नगर पालीका, अहमदनगर नगर पालीका येथील अग्निशामक गाडी यांना सपंर्क करुन अग्निशामक गाड्या आल्यानंतर त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात न आल्याने किराणा दुकानाच्या वर असलेली नगर अर्बन बँक, त्यावरील जिम, तसेच तळघरातील गोडाउन यांना आग लागली.

पहाटे 05/00 वा. चे सुमारास आग आटोक्यात आली. सदर आगीमुळे पोपटलाल लालचंद नावाने होलसेल किराणा दुकान, गोडाउन मधील किराणा मालाचे जळुन नुकसान झाले आहे. तसेच नगर अर्बन बँक मधील कागदपत्रे तसेच फर्निचर चे तसेच जिम मधील काही साहीत्याचे जळुन नुकसान झाले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी