भारताच्या 94 वर्षीय भगवानी देवी या आजींची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमाल सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई
By : Polticalface Team ,Tue Jul 12 2022 18:45:57 GMT+0530 (India Standard Time)
फिनलंड : येथे सुरू असलेल्या जागतिक मास्टर अॅथलीट चॅम्पियनशिपमध्ये सर्व वयोगटातील खेळाडूंना खेळण्याची संधी दिली जाते. 35 ते 90 वयोगटातील खेळाडू या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकतात.
यंदा 2022 च्या चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या 94 वर्षीय भगवानी देवी यांनी 100 मीटर स्प्रिंट स्पर्धा अवघ्या 24.74 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. तर शॉटपुटमध्ये कांस्यपदकाचीही कमाई केली. हा त्यांनी केलेला विक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.
भारताच्या 94 वर्षीय भगवान देवींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, वय हा अडथळा नाही. सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई, हा खरोखरच स्तुत्य प्रयत्न आहे.
1975 मध्ये वर्ल्ड मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती.
या चॅम्पियनशिपमध्ये यापूर्वी 5 वयोगटाचा समावेश करण्यात आला होता. परंतु आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता 12 वयोगटातील खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे.
वाचक क्रमांक :