सातबारा उताऱ्यावर मोबाईल क्रमांकासह ई - मेलची नोंदणी : तहसिलदार कुलथे
By : Polticalface Team ,Tue Jul 12 2022 19:55:36 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा महसूल विभागातील ई - फेरफार प्रकल्पाच्या आता खातेधारकांच्या सातबारा उताऱ्यावर मोबाईल क्रमांकासह ई - मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी माहिती संकलीत करायचे असून काम सुरू असून खातेधाराकांनी वैयक्तीक संपर्काची माहिती तलाठी कार्यालयात सादर करावी, असे अहवान तहसीलदार मिलींद कुलथे यांनी केले आहे. शासनाने ई - फेरफार प्रकल्पात जमीन मालकांची वैयक्तीक माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. सातबारा उतारा यावरील खातेदारांना त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. खातेदारांची प्राप्त झालेली माहिती तपासून झाल्यावर तलाठी डेटाबेसमध्ये साठविणर आहेत. यामुळे व्यवहाराच्या माहितीमध्ये बदल करून परस्पर व्यवहार करणे, बोगस कागदपत्रे सादर करून सातबारा उतारा यावर नावे लावणे, बोजा चढविणे, वारस नोंद लावणे आदी जमीन व्यवहारची माहिती खातेदारांच्या सातबारा लिंक असलेल्यासंपर्क क्रमांकावर मिळेल. यातून फसवणूकीला आळा बसणार आहे. याचबरोबर बँक खाते माहितीच्या आधारे शेतपिकांची नुकसान भरपाई थेट बँक खात्यावर तात्काळ देण्यास सुलभता येणार आहे. जमीनमालक खातेधारकांनी गावाचे नाव, खातेदाराचे नाव, गट नंबर, मोबाईल क्रमांक, ई - मेल आयडी ८ ( ऐच्छीक ), बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, E आदी माहिती आपल्या गावातील तलाठी यांचेकडे जमा करावी. असे आवाहन तहसिलदार मिलींद कुलथे यांनी केले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी