आता सराकरी सेवेतल्या डॉक्टरांना सरकारी सेवेमध्ये राहून खासगी प्रॅक्टीस देखील करता येणार
By : Polticalface Team ,Wed Jul 13 2022 10:00:13 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : सराकरी सेवेतल्या डॉक्टरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आता त्यांना सरकारी सेवेमध्ये राहून डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस देखील करता येणार आहे. कारण खासगी सेवेला मज्जाव करणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
2012 मध्ये राज्य सरकारने सरकारी डॉक्टरांना खासगी सेवा देण्यास मज्जाव करणारा अध्यादेश काढला होता. आता त्याऐवजी त्यांना विशेष व्यवसाय म्हणून रोख भत्ता सुरू केला होता.
अखेर या आदेशाला काही डॉक्टरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे काल यासंदर्भात सुनावणी झाली. यामध्ये तुर्तास सरकारी डॉक्टरांना सरकारने दिलासा देत खासगी प्रॅक्टीसला परवानगी दिली आहे.
वाचक क्रमांक :