आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक

By : Polticalface Team ,Wed Jul 13 2022 11:43:31 GMT+0530 (India Standard Time)

आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत 
राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची सद्यपरिस्थिती काय आहे याचा आढावा मांडला. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील काळात पाच वर्षे विरोधात काढली. त्यानंतर झालेल्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ५४ आमदार निवडून आणले. आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने, कल्पकतेने, दूरदृष्टीने राज्यात नवे सरकार स्थापन झाले. भाजप पक्षाला पवार साहेबांनी पुन्हा आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीतील लोकांना रूचले नाही व पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सर्व मार्गांनी झाला. देशात कुठेच भाजपचा अश्वमेध कोणी थांबवत नव्हते. मात्र महाराष्ट्रात पवार साहेबांनी हा अश्वमेध रोखला. पवार साहेबांनी अशक्य ते शक्य करुन दाखवत राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन केले. या कृतीतून महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, हा विश्वास त्यांनी निर्माण केला." राज्यातील सर्व यंत्रणा विरोधकांना झुकविण्यासाठी वापरात आणली जात आहे. त्यामुळे आता केवळ न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास राहिला आहे. पुढील काळात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे यावा यासाठी लोकांच्या मनाला गवसणी घालायला हवी. विरोधात राहूनही सत्ताधारी जे करू शकत नाहीत ते राष्ट्रवादी करून दाखवत आहे, असं सामान्य गोरगरीब माणसाला वाटलं पाहिजे. यासाठी रस्त्यावर येऊन लोकांचे प्रश्न मांडण्याची तयारी आपण ठेवायला हवी. आपण प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करायला हवे. प्रत्येक समाजाला सोबत घेऊन पुढे जायला हवे. हे सगळं केलं तर २०२४ हे वर्ष आपलंच असेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते मा. छगन भुजबळ, मा. हसन मुश्रीफ, खासदार सुप्रियाताई सुळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्माबाबा आत्राम, प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विद्यार्थी सेल प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष अॅड. जयदेव गायकवाड, डॉक्टर सेल प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, आदिवासी सेल प्रदेशाध्यक्ष राजू तोडसाम, उद्योग व कामगार सेल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, वक्ता सेल प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, सेवा दल प्रदेशाध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील तसेच विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, सर्व फ्रंटल व सेलचे पदाधिकारी, जिल्हा निरीक्षक, जिल्हाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. Sharad Pawar Jayant Patil - जयंत पाटील Ajit Pawar Chhagan Bhujbal Hasan Mushrif Supriya Sule राष्ट्रवादी माजी सैनिक सेल #NCP
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष