स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत ' हर घर तिरंगा ' या उपक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा -जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

By : Polticalface Team ,Sat Jul 16 2022 15:35:21 GMT+0530 (India Standard Time)

स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत ' हर घर तिरंगा '
या उपक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा
            -जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले अहमदनगर, 15 जुलै - भारतीय स्‍वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभुमीवर जनतेच्‍या मनात या स्‍वातंत्र्य लढ्याच्‍या स्‍मृती तेवत रहाव्‍यात, स्‍वातंत्र्य संग्रामातील अज्ञात, नायक, क्रांतीकारक, स्‍वातंत्र्य संग्रामात घडलेल्‍या विविध घटना यांचे स्‍मरण व्‍हावे, देशभक्‍तीची जाज्‍वल्‍य भावना कायम स्‍वरूपी जनमाणसात रहावी. या उद्देशाने स्‍वातंत्र्याचा #अमृत #महोत्‍सव राज्‍यभरात राबविण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून 11 ऑगस्‍ट ते 17 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्‍या सूचनेनुसार "#हरघरतिरंगा" हा उपक्रम राज्‍यासह जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणार आहे. "हर घर तिरंगा" या उपक्रमात जिल्‍ह्यातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन #जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त "हर घर तिरंगा" हा उपक्रम संपूर्ण जिल्‍ह्यात राबविण्‍याबाबतच्‍या नियोजनासंदर्भात जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. भोसले बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषेदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी संदिप निचित उपस्थित होते. जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यावेळी म्‍हणाले, "हर घर तिरंगा" या उपक्रमात लोकसहभाग महत्‍वाचा असून जिल्‍ह्यातील 9 लाख 39 हजार 481 घरांवर भारताचा राष्‍ट्रीय ध्‍वज तिरंगा फडकाविण्‍याचे नियोजित आहे. या उपक्रमात जिल्‍ह्यातील, तालुक्‍यातील, गावागावातील, नागरीकांनी आपल्‍या घरावर तिरंगा ध्‍वज फडकवावा, यासाठी सर्व जनतेचा सहभाग आवश्‍यक आहे. "हर घर तिरंगा" या उपक्रमासाठी शहरात महानगरपालिकेचे आयुक्‍त समन्‍वय अधिकारी असून तालुका पातळीवर गटविकास अधिकारी समन्‍वय अधिकारी आहेत. या उपक्रमासाठी जिल्‍ह्यातील मोठ्या पुरवठादारांकडून आणि बचत गटाच्‍या माध्‍यमातुन तिरंगा ध्‍वज बनवून घेण्‍यात येणार असून शहरात व तालुक्‍यात, गावात विक्रीसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. अशी माहिती त्‍यांनी दिली. जिल्‍ह्यातील ज्‍या संस्‍थांना, व्‍यक्‍तींना आपल्‍या मार्फत राष्‍ट्रीय ध्‍वज, डोनेट किंवा उपलब्‍ध करुन द्यायचा असेल त्‍यांनी तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्‍या कार्यालयांशी, तसेच शहरासाठी महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा असे त्‍यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यावेळी म्‍हणाले, स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत जिल्‍ह्यामध्‍ये प्रशासनातर्फे अनेक उपक्रम रा‍बविले जात आहेत. "हर घर तिरंगा" हा उपक्रमांतर्गत 11 ऑगस्‍ट ते 17 ऑगस्‍ट 2022 दरम्‍यान शासनाच्‍या नियमानुसार ध्‍वज 30 इंच बाय 20 इंच आकाराचा किंवा लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 आयताकार आकारात असावा, तिरंगा ध्‍वज (झेंडा) फक्‍त कापडी असावा. जिल्‍ह्यातील, तालुक्‍यातील प्रत्‍येक शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आवारात राष्‍ट्रीय ध्‍वज उभारण्‍यात येणार आहे. तसेच प्रत्‍येक नागरीकांनीसुध्‍दा तिरंगा ध्‍वज विकत घेऊन आपल्‍या घरावर, इमारतीवर, खाजगी आस्‍थापनेवर, राष्‍ट्रध्‍वज फडकावयाचा आहे. या ध्‍वजाची किंमत 30/- रुपये आहे. जिल्‍हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या वर्गनीतुन "हर घर तिरंगा" या उपक्रमासाठी 75 हजार ध्‍वज, तालुक्‍यातील व ग्रामीण भागातील जनतेला उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. हा उपक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्‍येने यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले. *स्‍वराज्‍य अमृत महोत्‍सव उपक्रम* जिल्‍ह्यात दि. 9 ऑगस्‍ट ते 15 ऑगस्‍ट 2022 या काळात स्‍वराज्‍य महोत्‍सव आयोजित करण्‍यात यावा. या कालावधीमध्‍ये जिल्‍हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर सांस्‍कृतिक कार्यक्रम, निबंध स्‍पर्धा, प्रदर्शन, मॅरेथॉन, प्रभात फेरी आदी कार्यक्रम आयोजित करण्‍यात यावे. जिल्‍हा व तालुका पातळीवर हुतात्‍मा स्‍मारंकाची डागडुजी, देखभाल आणि दुरूस्‍ती करून त्‍यांचे सुशोभीकरण करावे. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांतर्फे सभा घेण्‍यात याव्‍यात. 15 ऑगस्‍ट 2022 रोजी मुख्‍यालयाच्‍या ठिकाणी "तिरंगा बलुन" सोडण्‍यात येईल. याच दिवशी 75 फुट उंचीचा राष्‍ट्रध्‍वज जिल्‍हा स्‍तरावर उभारण्‍यात येईल. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवाचे बोधचिन्‍ह व संविधान स्‍तंभ जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात उभारण्‍यात येईल. आपल्‍या घरावर ध्‍वज उभारतांना नागरीकांनी ध्‍वजाचा अवमान होणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्‍यक असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांनी सांगितले. लोकसहभागातून हा उपक्रम यशस्‍वी करावा असे आवाहनही जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष